18 भारतीय बँकांना प्रभावित करतोय हा Virus, तुमचा एटीएम पीन आणि इतर माहिती करू शकतो चोरी

एक नवा व्हायरल अँड्रॉईड युजर्सला लक्ष्य करत आहे. इतकेच नाही तर त्यांच्या मोबाइलमधील डेटाही चोरी केला जात असल्याचं समोर आलं आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अँड्रॉईड युजर्ससाठी महत्त्वाची बातमी
  • ड्रिनिक व्हायरसने वाढवली सर्वांची चिंता

alert for android users: ड्रिनिक अँड्रॉईड ट्रोजन याचा एक नवा मालवेअर आढळून आला आहे. जो आपली महत्त्वाची माहिती, बँकिंग डिटेल्स चोरी करु शकतो. ड्रिनिक हा एक जुना मालवेअर व्हायरल आहे जो 2016 पासून खूपच चर्चेत आहे. भारत सरकारने आधी अँड्रॉईड युजर्सला या मालवेअर संदर्भात अलर्ट केलं होतं. जो इन्कम टॅक्स रिफंड जनरेट करण्याच्या नावाखाली युजर्सची माहिती चोरी करतो. (indian banks works affected due to this virus your banking details may leak read details in marathi)

आता हाच व्हायरसचं नवं व्हर्जन समोर आलं आहे. इतकेच नाही तर या व्हर्जनने भारतातील युजर्स आणि 18 भारतीय बँकांना टार्गेट करत आहे. या बँकांची माहिती अद्याप मिळालेली नाहीये मात्र, या बैंकांमध्ये एसबीआय असल्याचं बोललं जात आहे.

हे पण वाचा : 12 राशींपैकी सर्वाधिक धोकादायक रास कोणती? वाचा

ड्रिनिक व्हायरसचं नवं व्हर्जन आढळून आलं आहे जे एपीके फाईलसह एक एसएमएस पाठवून युजर्सला टार्गेट करतं. यामध्ये iAssist नावाचा एक App आहे जो भारताच्या आयकर विभागाच्या अधिकृत कर व्यवस्थापन टूल सारखे काम करते. एकदा जेव्हा युजर आपल्या अँड्रॉईड फोनवर App इन्स्टॉल करतात त्यावेळी ते App तुमच्याकडून काही गोष्टींची परवनागी मागतं. यामध्ये एसएमएस  रिडिंग, कॉल लॉग रिडिंग आणि स्टोरेज अ‍ॅक्सेसच्या संदर्भातील परवानगी मागितली जाते.

हे पण वाचा : या दोन राशींचे जोडपे असते सर्वात Cute

जेव्हा या App ला सर्व गोष्टींची परवानगी युजरकडून मिळते त्यावेळी एक फिशिंग पेज लोड करण्याऐवजी वेबव्यूच्या माध्यमातून एक वास्तविक भारतीय आयकर वेबसाईट ओपन होते. त्यानंतर या साईटवर जेव्हा युजर आपलं लॉगइन करतो तेव्हा त्याच्या स्क्रिनचं रेकॉर्डिंग होण्यास सुरुवात होते.

या App च्या माध्यमातून तुमचा वैयक्तिक डेटा, बँकिंग डिटेल्स आणि इतर माहिती चोरी केली जावू शकते. त्यामुळे कोणतंही थर्ड पार्टी App इन्स्टॉल कर नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी