Data Protection Bill 2022 : तुमचा डेटा आणखी होणार सुरक्षित, केंद्र सरकार आणणार कायदा

Data Protection Bill 2022 : केंद्र सरकार लवकचर डेटा प्रोटेक्शन कायदा आणणार आहे.  यामुळे प्रत्येक युजरचा डेटा आणखी सुरक्षित होणार आहे. हा कायदा फक्त खासगी संस्थाच नव्हे तर सरकारलाही लागू होणार आहे. कारण सामान्य नागरिकांची माहिती सरकारकडेही असते. अनेकवेळेला ई कॉमर्स आणि सोशल मीडिया कंपन्या युजरची माहिती गोळा करते. युजरच्या माहितीशिवाय ही माहिती थर्ड पार्टीलाही विकली जाते. आता या गोष्टींचा चाप बसणार आहे. 

थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकार लवकचर डेटा प्रोटेक्शन कायदा आणणार आहे.  
  • यामुळे प्रत्येक युजरचा डेटा आणखी सुरक्षित होणार आहे.
  • हा कायदा फक्त खासगी संस्थाच नव्हे तर सरकारलाही लागू होणार आहे.

Data Protection Bill 2022 : केंद्र सरकार लवकचर डेटा प्रोटेक्शन कायदा आणणार आहे.  यामुळे प्रत्येक युजरचा डेटा आणखी सुरक्षित होणार आहे. हा कायदा फक्त खासगी संस्थाच नव्हे तर सरकारलाही लागू होणार आहे. कारण सामान्य नागरिकांची माहिती सरकारकडेही असते. अनेकवेळेला ई कॉमर्स आणि सोशल मीडिया कंपन्या युजरची माहिती गोळा करते. युजरच्या माहितीशिवाय ही माहिती थर्ड पार्टीलाही विकली जाते. आता या गोष्टींचा चाप बसणार आहे.  (indian government introduce new data protection bill 2022)

केंद्र सरकार नवीन कायदा आणला आहे आणि त्यावर सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया विचारल्या आहेत. जर कुणी युजरच्या डेटाचा दुरुपयोग केल्यास त्याला ५०० कोटी रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.  या कायद्याच्या अखत्यारित बँकेची केव्हायसी प्रणालीही येणार आहे. या कायद्यामुळे नवीन बँक खाते उघडताना केव्हायसी प्रक्रिया अनिवार्य असणार आहे. केव्हायसीतून मिळालेली माहिती नव्या कायद्याच्या अंतर्गत  येणार आहे.  एखाद्या खातेदाराने बँक खाते बंद केल्यानंतर ६ महिन्यापर्यंत बँकेला ही माहिती ठेवणे बंधनकारक राहणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी