मुंबई : ट्रेनमध्ये प्रवास करताना घाईगडबडीत आपण आपलं सामान विसरतो. पण असं काही झाल्या फार काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ट्रेनमध्ये विसरलेलं सामान नेमकं परत कसं मिळवायचं.
भारतीय रेल्वेला देशाची जीवनरेषा म्हटले जाते. ट्रेनमध्ये सर्व वर्गातील लोक प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. यासोबतच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या सामानाची काळजी घेते. जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि ट्रेनमधे तुमचे सामान चुकून राहिले तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला ट्रेनमध्ये राहिलेलं सामान परत कसे मिळवायचे ते सांगणार आहोत.
तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना कळवा
यासाठी रेल्वेने एक यंत्रणा तयार केली आहे. या अंतर्गत, तुम्ही हरवलेल्या वस्तूंबद्दल तक्रार करू शकता आणि ते परत मिळवू शकता. यासाठी तुम्ही ट्रेनमधून उतरलात की, तिथून लवकरात लवकर स्टेशन मास्टर ऑफिस गाठावे लागेल. सर्वप्रथम स्टेशनवर रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासह आरपीएफला लेखी माहिती द्या. तुम्ही RPF मध्ये FIR देखील दाखल करू शकता. असे करताना तुमचे सामान शोधण्यासाठी तपास करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची असेल.
लेखी तक्रार दाखल करा:
तक्रारीत तुम्हाला तुमची बोगी आणि सीट नंबर नमूद करावा लागेल. यानंतर रेल्वे टीम ट्रेनमध्ये जाऊन तुमची सीट तपासेल. तेथे सामान आढळल्यास तो जवळच्या आरपीएफ पोलिस ठाण्यात जमा केला जाईल. यासह, अनेक प्रकरणांमध्ये जप्त केलेला माल त्याच स्थानकावर पोहोचवला जातो जेथे तक्रारदाराने एफआयआर दाखल केली आहे. तुमचे हरवलेले सामान रेल्वेला सापडल्यावर ते तुम्हाला कळवतील. यानंतर तुम्हाला तुमचे सामान आणि प्रवासाचा तपशील दाखवावा लागेल. सर्व कागदपत्रे बरोबर असल्यास सामान तुम्हाला परत केला जाईल.
अधिक वाचा: Optical Illusion: चालवा डोकं आणि शोधून दाखवा 8 मधलेला क्रमांक 6
हरवलेल्या वस्तू मिळवण्याचा नेमका कायदा काय?
ट्रेनमध्ये सामान आढळल्यास ते रेल्वे स्टेशनवर जमा केले जाते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्टेशनवर त्याची तपासणी केली जाते. सामान जर मौल्यवान असेल तर ते स्टेशनवर ठेवले जाते. जर मालकाने २४ तासांच्या आत मालावर दावा केला तर कागदपत्रे तपासल्यानंतर माल परत केला जातो. जर कोणी दावा केला नाही तर २४ तासांनंतर माल झोनल ऑफिसला पाठवला जातो.