Instagram Down: फीड रिफ्रेश होत नाही, DM करतानाही त्रास; Twitter वर तक्रारींचा पूर, सेवा पूर्ववत

टेक इट Easy
Pooja Vichare
Updated Sep 23, 2022 | 09:43 IST

Instagram Down: Instagram गुरुवारी रात्री अचानक डाऊन झालं ज्यामुळे कोट्यवधी यूजर्स नाराज झाले. काही मिनिटातच सोशल मीडियावर लोक याविषयी तक्रारी करू लागले.

Instagram down worldwide
Instagram यूजर्सं संतापले, थेट Twitter वर केली तक्रार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग (Photo and video sharing platform) प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) जगभरात डाऊन झालं.
  • Instagram गुरुवारी रात्री अचानक डाऊन झालं ज्यामुळे कोट्यवधी यूजर्स नाराज झाले.
  • काही मिनिटातच सोशल मीडियावर लोक याविषयी तक्रारी करू लागले. इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म डाऊन असल्यामुळे त्यांना लॉग इन करण्यात समस्या येत होत्या.

नवी दिल्ली: Instagram was Down: फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग (Photo and video sharing platform)  प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) जगभरात डाऊन झालं. इंस्टाग्राम डाऊन (Instagram was down) होताचच ट्विटरकरांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आम्हाला माहित आहे की लोक इंस्टाग्राम वापरू शकत नाही आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर परिस्थिती सामान्य करण्यासाठी काम करत आहोत.

Instagram ने रात्री 12 वाजता उशीरा ट्विट केलं आणि आम्ही पुन्हा आलो आहोत! आजच्या व्यत्ययास कारणीभूत असलेल्या समस्येचे आम्ही निराकरण केलं आहे आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आउटेजचे कारण अद्याप समजले नसले तरी,इंस्टाग्रामने दावा केला आहे की, ते या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करत आहेत.

अधिक वाचा-  'या' 10 राज्यांना IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या महाराष्ट्रातल्या पावसाची परिस्थिती

नेमकं काय झालं होतं? 

Instagram गुरुवारी रात्री अचानक डाऊन झालं ज्यामुळे कोट्यवधी यूजर्स नाराज झाले. काही मिनिटातच सोशल मीडियावर लोक याविषयी तक्रारी करू लागले. इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म डाऊन असल्यामुळे त्यांना लॉग इन करण्यात समस्या येत होत्या. फीड देखील रिफ्रेश होत नव्हतं. काही युजर्सना मेसेजिंगमध्येही समस्या येत होत्या. इन्स्टाग्राम डाऊन होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही इन्स्टा डाऊन झाल्यामुळे युजर्सना अडचणींचा सामना करावा लागला होता.

इंस्टाग्राम डाऊन झाल्यामुळे यूजर्स नाराज

फोटो-व्हिडिओ शेअरिंग अॅप इन्स्टाग्राम डाऊन आहे आणि लोकांना अॅपच्या क्रॅशचा सामना करावा लागत आहे, असा दावा यूजर्संनी केला. कंपनीने ट्विट केले की, "आम्हाला माहित आहे की काही लोकांना इंस्टाग्राम वापरण्यात अडचण येत आहे. आम्ही ते शक्य तितक्या लवकर सामान्य करण्यासाठी काम करत आहोत. गैरसोयीबद्दल क्षमस्व.''

अॅप क्रॅश झाला

Downdetector च्या रिपोर्टरच्या मते, 66 टक्के इंस्टाग्राम आउटेज अॅप क्रॅश झाल्याची तक्रार करत होते. तर सर्व्हर कनेक्शनसाठी 24 टक्के आणि उर्वरित 10 टक्के लॉग इन करणे कठीण होते, तर काही वापरकर्त्यांना फक्त Instagram अॅप लॉगिनमध्ये अडचण येत आहे, इतर लोक या सेवेचा बिल्कुल सुद्धा वापर करू शकत नव्हते.

Twitter वर ट्रेंडिंग - Instagram down

काही महिन्यांपासून Instagram वर अशा प्रकारची समस्या सातत्याने येत आहे. Instagram डाऊन होताच ट्विटरवर कमेंट्सचा महापूर आल. अनेक युजर्सनी आपल्या तक्रारी ट्विटरवर शेअर केल्या. इंस्टाग्राम यूजर्संनी ट्विटरवर #InstagramDown हा हॅशटॅग रोल आउट करण्यास सुरुवात केली, जी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ट्रेंड झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी