Instagram Data Leak: लाखोंच्या संख्येत इंस्टाग्राम यूजर्सचा डेटा लीक, फेसबुकनं मान्य केली चूक

टेक इट Easy
Updated Apr 20, 2019 | 08:13 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Instagram Data Leak: फेसबुकनं एका ब्लॉगमधून मान्य केलं की, त्यांच्याकडून सुरक्षेत चूक झाली. त्यामुळं लाखोंच्या संख्येत इंस्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झालाय.

Instagram
इंस्टाग्रामचा डेटा लीक  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली: फेसबुकनं स्वीकार केलंय की, पासवर्डच्या सुरक्षेबाबतीत झालेल्या चुकीमुळं प्रभावित झालेल्या इंस्टाग्राम युजर्सची संख्या चार आठवड्यांपूर्वी सांगण्यात आलेल्या अंदाजा पेक्षा अधिक आहे. सोशल मीडियात अव्वल स्थानावर असलेल्या फेसबुकनं मार्च महिन्याच्या अखेरीस सांगितलं की, त्यांनी चुकीनं सामान्य टेक्स्टमध्ये पासवर्ड सेव्ह केले होते. त्यामुळं त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी ते शोधणं शक्य झालं. पासवर्ड अंतर्गत कंपनी सर्व्हरमध्ये सेव्ह करून ठेवले होते आणि कोणत्याही बाहेरचा व्यक्ती त्यापर्यंत पोहचू शकत नव्हता. फेसबुकनं गुरूवारी पोस्ट केलेल्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं की, सुरक्षेत चूक झाल्यामुळे लाखोंच्या संख्येत इंस्टाग्राम यूजर्स प्रभावित झाले, असा अंदाज आहे. अगोदर ही संख्या हजारांच्या घरात सांगितली गेली होती. 

यापूर्वी ही फेसबुक पासवर्ड लीकच्या प्रकरणात यूजर्स आणि विविध देशातील सरकार यांच्या निशाण्यावर होतं. गेल्या वर्षी केम्ब्रिज एनालिटिका लीक प्रकरणात फेसबुकचं नाव समोर आलं होतं. केम्ब्रिज एनालिटिका प्रकरणात फेसबुकच्या जवळपास ८.७ कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला होता. या डेटाचा वापर अमेरिकेतील निवडणुकीत केला गेला होता. 

काही महिन्यांपूर्वी फेसबुकनं पासवर्ड लीकसोबत निगडित एक रिपोर्ट समोर आला होता. यात म्हटलं होतं की, मोठ्या संख्येमध्ये फेसबुक यूजर्सचे पासवर्ड असुरक्षित आहेत. कंपनीमध्ये काम करणारे लोकं खूप सहज या पासवर्डपर्यंत पोहोचू शकत होते. मात्र, कंपनीकडून सांगण्यात आलं होतं की, सर्व यूजर्सचे पासवर्ड अगदी सुरक्षित आहेत. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचू शकत नाही.

इंस्टाग्रामच्या प्रवक्त्यानुसार आणखी अधिक यूजर्सचा डेटा लिक व्हायच्या आधीच आम्हाला त्या बगची माहिती मिळाली आणि संकट टळलं. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार बग इंस्टाग्रामच्या त्या फीचरमध्ये सापडला ज्यातून यूजर्स आपल्या अकाऊंटचा डेटा डाऊनलोड करू शकतात. इंस्टाग्रामनुसार, ज्यांनी डाऊनलोडच्या या सेवेचा वापर केला त्यांचे पासवर्डनं आपोआप एका URLमध्ये मिळून गेले. नंतर हे पासवर्ड फेसबुकच्या सर्व्हरमध्ये सेव्ह झाले. या प्रकरणी इंस्टाग्रामनं विश्वास दर्शवला आहे की, त्यांनी या नवीन फीचरमध्ये आता सुधारणा केली आहे. मात्र, सावधगिरी म्हणून यूजर्सनी आपले पासवर्ड बदलून टाकावेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Instagram Data Leak: लाखोंच्या संख्येत इंस्टाग्राम यूजर्सचा डेटा लीक, फेसबुकनं मान्य केली चूक Description: Instagram Data Leak: फेसबुकनं एका ब्लॉगमधून मान्य केलं की, त्यांच्याकडून सुरक्षेत चूक झाली. त्यामुळं लाखोंच्या संख्येत इंस्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झालाय.
Loading...
Loading...
Loading...