Check your password: तुमचा सोशल अकाऊंटचा पासवर्ड हॅक तर झाला नाही ना?

टेक इट Easy
Updated Jun 26, 2019 | 18:22 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Check your password: सध्याचा जमाना इंटरनेटचा असल्यामुळं जे काही घडतंय ते ऑनलाईन घडताना दिसत आहे. डेटा चोरीच्या सततच्या घटनांमुळं तुमच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटचा पासवर्ड सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे.

check your pass word
आता क्रोमवरच चेक करा तुमचा पासवर्ड!  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत जगभरात सोशल मीडिया अकाऊंट मोठ्या प्रमाणावर हॅक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. फेसबुकवरून डेटा लीक प्रकरणानंतर, अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. त्यात सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊन डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रामुख्याने यूजर्सचा यूजर नेम आणि पासवर्ड लीक झाला आहे. त्यानंतर याचा वापर करून यूजर्सचा डेटा इंटरनेटवर विकल्याच्या घटनाही ऐकायला मिळाल्या आहेत. सध्याचा जमाना इंटरनेटचा असल्यामुळं जे काही घडतंय ते ऑनलाईन घडताना दिसत आहे. त्यामुळं तुमच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटचा पासवर्ड सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे. आपली खासगी माहिती कोणालाही लीक होऊ नये. त्याचा बाजार केला जाऊ नये, यासाठी आपणच काळजी घेणं गरजेचं आहे.

गुगलचे फिचर

सोशल मीडिया यूजर्ससाठी महत्त्वाचं म्हणजे, जर, तुमच्या सोशल मीडिया अकाउंटच्या डिटेल्स चोरीला गेल्या तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, एक सिस्टम आहे की, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता. या  फिचरला गुगल क्रोमचे एक्सटेन्शन म्हणूनही पाहिले जाऊ शकते. कारण, हे फिचर वापरण्यासाठी तुमच्याकडे क्रोमचे लेटेस्ट व्हर्जन असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे चालू इंटरनेट कनेक्शन असणंही गरजेचं आहे. तेव्हा पाहूया तुम्ही तुमचा पासवर्ड कसा चेक करू शकता ते.

पासवर्ड चेक करण्यासाठीच्या स्टेप्स अशा

  1. सुरुवातीला तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर गुगल क्रोम ओपन करा
  2. त्यानंतर गुगल क्रोम स्टोअर ओपन करा आणि तुमच्या पासवर्ड चेकअपसाठी सर्च करा
  3. ते इंस्टॉल करण्यासाठई अॅड टू क्रोमवर क्लि करा
  4. पासवर्ड चेकअप टूल आपोआप काम करू लागेल

हॅक झाल्यास मिळणार सूचना

ही सिस्टम तुमच्या पासवर्डला तुमचे अकाऊंट किंवा सर्व्हिस लॉग इन करताना मॉनिटर करत असते. जर, तुमचा पासवर्ड लीक झाला तर, एक्सटेन्शवर तुम्हाला वॉर्निंग मिळते. गुगल क्रोमच तुम्हाला रेड कलचा वॉर्निंग पॉपअप देईल त्यात पासवर्ड बदलण्याची सूचना देण्यात आलेली असेल आणि जोपर्यंत तुम्ही पासवर्ड चेंज करणार नाही तोपर्यंत पॉपअप ग्रीन होणार नाही. इंटरनेटच्या जमान्यात पासवर्ड सिक्युरिटी अतिशय महत्त्वाची आहे. पासवर्ड हॅक झाल्यास तुमची खासगी माहिती विकली जाऊ शकते. तसेच तुमची बऱ्याच कामांचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळं गुगल क्रोम स्टोअर ओपन करा आणि तुमचा पासवर्ड चेकअपसाठी सर्च करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...