Iphone 12 price cut : ॲपलप्रेमींसाठी गूड न्यूज! आयफोन 12 झाला स्वस्त, जाणून घ्या किंमत

आयफोनप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. आयफोन 14 लॉन्च होणार असल्यामुळे आता आयफोन 12 कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे.

Iphone 12 price cut
Iphone 12 झाला स्वस्त  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • आयफोन 12 स्वस्तात उपलब्ध
  • अमेझॉनवर सर्वात कमी किंमतीत उपलब्ध
  • ऑफलाईन खरेदीवरही सुरू आहे ऑफर

Iphone 12 Price Cut : ॲपल (Apple) कंपनीकडून लवकरच आयफोन 14 (Iphone 14) लॉन्च होणार असल्यामुळे आयफोन 12 (Iphone 12) च्या किंमती कमी होणार (Price discount) आहेत. जेव्हा जेव्हा नवा आयफोन कंपनीकडून बाजारात आणला जातो, तेव्हा त्याआधीच्या मॉडेलच्या किंमती कमी केल्या जातात. त्यामुळे नव्याने बाजारात येणाऱ्या मोबाईलच्या आधीचे व्हर्जन विकत घेणं अनेकांना शक्य होतं. अनेकजण तर जुनं मॉडेल घेण्यासाठी नव्या मॉडेलच्या लॉन्चिंगची वाटत पाहत असतात. अशा सर्व आयफोनप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. ॲपल कंपनीनं नवं मॉडेल बाजारात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयफोन 12 च्या किंमती कमी केल्या आहेत. 

आयफोन 13 महाग

आयफोन 14 येत असला तरी अद्याप आयफोन 13 मात्र स्वस्त झालेला नाही. त्याची किंमत आजही चढीच आहे, जी सर्वसामान्यांना परवडणारी नसते. मात्र जर आयफोन 12 घ्यायचा तुमचा विचार असेल, तर मात्र तो आता बजेटच्या जवळपास आलाय, असं म्हणता येऊ शकेल. जर तुमचं बजेट 50 हजारांच्या आसपास असेल, तर तुम्ही आयफोन 12 विकत घेण्याचा विचार नक्कीच करू शकता. जाणून घेऊया, कसं असेल पूर्ण डील.

ऑनलाईन डिस्काउंट

Iphone 12 हा मोबाईल ॲपलच्या अधिकृत वेबसाईटवर मूळ किंमतीलाच विकला जात आहे. मात्र जर इतर प्लॅटफॉर्मचा विचार केला, तर मात्र त्याची किंमत कमी झाली आहे. अमेझॉनवर आयफोन 12 हा 55,000 रुपयांना उपलब्ध आहे. हे आयफोन 12 चं बेसिक मॉडेल असून त्याची मेमरी 64GB असणार आहे. 2021 मध्ये या मॉडेलची किंमत कंपनीकडून कमी करण्यात आली होती आणि तो 65,900 रुपयांना विकला जात होता. आजही ॲपलच्या अधिकृत बेवसाईटवर त्याची तेवढीच किंमत आहे. मात्र अमेझॉनवर सध्या सुरू असलेल्या डीलनुसार या आयफोनची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या फोनसोबतच 9500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. अर्थात तुमच्या मोबाईलची सध्याची अवस्था कशी आहे, त्यावर तुम्हाला मिळणारी रक्कम अवलंबून असणार आहे. 

अधिक वाचा - किंमत 5.25 लाख आणि देते 35Km मायलेज! Maruti ची ही स्वस्त कार खरेदीसाठी झुंबड

कुठल्या प्लॅटफॉर्मवर किती किंमत?

फ्लिपकार्टवर आयफोन 12 ची किंमत काहीशी अधिक असून तो 59,999 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर अलावा कंपनी या मॉडेलवर 12,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देत आहे. कुठलं डील अधिक फायद्याचं ठरेल, हे पाहण्यासाठी या सर्व ठिकाणी तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी रक्कम तपासू शकता आणि परवडणारं डील घेऊ शकता. 

अधिक वाचा - अवघ्या 11 हजारांत बुक करा Maruti Suzuki Grand Vitara, एक लिटर पेट्रोलवर चालणार 28 KM

ऑफलाईन डिस्काउंट

अधिकृत आयफोन स्टोअरमध्ये आयफोन 12 वर डिस्काउंट सुरु आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला बँक ऑफरचा उपयोग करावा लागेल. तिथे हा मोबाईल तुम्ही 55,900 रुपयांत खरेदी करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी