Trai च्या आदेशानंतर Airtel, Jio आणि Vi ने एक महिन्याची वैधता असलेले प्लॅन्स लॉन्च केले आहेत. जियोने एक महिन्याची वैधता असलेला प्लॅन बाजारात आणला आहे. तर वोडाफोन आणि आयडियाने ३१ आणि ३० दिवसांची वैधता असलेले दोन प्लॅन जारी केले आहेत. एअरटेलने ३० दिवसांची वैधता असलेला प्लॅन लॉन्च केला आहे. तीनही ब्रँड्सचे प्लॅनची किंमत वेगवेगळी आहे, जाणून घेऊया कुणाचा प्लॅन स्वस्त आणि चांगला आहे. (Jio, Airtel and Vi launched new one month validity plan after trai order)
एयरटेल च्या ३१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज दोन जीबीचा डेटा मिळतो. तसेच याशिवाय ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएससह ऍमेझॉन प्राईम व्हिडीओचे मोबाईल एडिशन ट्रायलही मिळत आहे. ऍमेझॉनशिवाय ग्राहकांना Wynk Music चेही सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
जियोने आपल्या ग्राहकांसाठी २५९ रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनची वैधता एक महिना असून ग्राहकांना दररोज १.५ जीबीचा डेटा मिळणार आहे. या प्लॅनची खासियत म्हणजेच महिना ३१ दिवसांचा असो वा ३० दिवसांचा कॅलेंडरप्रमाणे एक महिना असलेल्या या प्लॅनची वैधता असणार आहे.
वोडाफोन आयडियाने ३० आणि ३१ दिवसांचे दोन प्लॅन जारी केले आहे. कंपनीने ३२७ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वॅलिडिटी दिली आहे. तसेच २५ जीबी डेटा देऊ केला आहे. तर वोडाफोन इंडियाच्या दुसर्या प्लॅनमध्ये २८ जीबी डेटा दिला आहे. या प्लॅनची किंमत ३३७ रुपये इतकी आहे. या प्लॅन सोबत ग्राहकांना Vi Movies आणि टीव्ही ऍपसचे सबस्क्रिप्शनही मिळते.