Jio Fiber : Jio ची बेस्ट ऑफर, ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि ओटीटी सबस्क्रिप्शन

जियो प्रीपेड आणि पोस्टपेडसह फायबर सेवाही देत आहे. म्हणजेच जिओफायबर ही सेवा प्रीपेडमध्येही उपलब्ध आहे. यात ग्राहकांना महिन्याचे प्लॅन्स मिळत असून या प्लॅनची सुरूवात 30Mbps पासून सुरू होते.

jio fiber
जियो फायबर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जियो प्रीपेड आणि पोस्टपेडसह फायबर सेवाही देत आहे.
  • म्हणजेच जिओफायबर ही सेवा प्रीपेडमध्येही उपलब्ध आहे.
  • यात ग्राहकांना महिन्याचे प्लॅन्स मिळत असून या प्लॅनची सुरूवात 30Mbps पासून सुरू होते.

Jio Fiber Plan : मुंबई : जियो प्रीपेड (jio prepaid) आणि पोस्टपेडसह (postapaid) फायबर (Fiber) सेवाही देत आहे. म्हणजेच जिओफायबर ही सेवा प्रीपेडमध्येही उपलब्ध आहे. यात ग्राहकांना महिन्याचे प्लॅन्स मिळत असून या प्लॅनची सुरूवात 30Mbps पासून सुरू होते. (jio fiber offer unlimited data free calling and ott subscription)

ग्राहकांना या सेवेत ६ महिने आणि १२ महिन्यांची बिलिंग सायकलचा पर्याय मिळतो. जाणून घेऊया जियो फायबरमध्ये सर्वात स्वस्त प्लॅन कुठला आहे?

बेसिक प्लॅन

जियो फायबरचा सर्वात स्वस्त प्लॅन ३९९ रुपयांचा आहे. त्यात जीएसटी समावेश नाही या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आण फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. हा प्लॅन एक महिन्याचा आहे.

या बेसिक प्लॅनमध्ये ग्राहकांना 30Mbps अपलोड आणि 30Mbps ची डाऊनलोड स्पीड मिळते. हा जियोचा बेसिक प्लॅन असला तरी ग्राहकांना यात खूप सारे फायदे मिळतात.

४९९ चा जियो फायबर प्लॅन

जियो फायबरचा ४९९ रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनवर ग्राहकांना जीएसटी द्यावा लागणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30Mbps आणि अनलिमिटेड डेटा मिळतो. यात ग्राहकांना फ्री कॉलिंगची सुविधा मिळतेच. तसेच ग्राहकांना ४००हून अधिक टीव्ही चॅनेल्सचाही फायदा मिळतो.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचेही सबस्क्रिप्शन मिळतं. त्यात Universal +, ALT Balaji, Eros Now, Lionsgate Play, Jio Cinema, Shemaroo Me आणि जियो सावनचेही सबस्क्रिप्शन मिळतं. ग्राहकांना १०० रुपये देऊन ६ ओटीटी प्लॅटफॉर्मचा एक्सेस मिळतो. 

५९९ चा जियो फायबरचा प्लॅन

जियो फायबरचा ५९९ चा एक प्लॅन आहे. त्यातही ग्राहकांना 30Mbps स्पीड मिळणार आहे. या प्लॅनचा फायदा असा की यात ग्राहकांना २०० रुपये अधिक दिल्यास १४ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा एक्सेस मिळणार आहे. या ओटीटीमध्ये Disney+ Hotstar, Sony Liv, ZEE5चा समावेश आहे. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५५० हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा लाभ मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी