Jio Cheapest Recharge: Jio ने आणला एक रुपयांचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन, ३० दिवसांची असणार वॅलिडीटी

जिओने कुठलाही गाजावाजा न करता सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. देशातील कुठल्याही नेटवर्क कंपनीने एवढा स्वस्तातला प्लॅन अजून दिलेला नाही. जिओचा हा नवीन प्लॅन अवघ्या एक रुपयात मिळणार आहे. तसेच ग्राहकांना या रिचार्जवर ३० दिवसांची वॅलिडीटीही मिणार आहे. 

jio
जिओ 
थोडं पण कामाचं
  • जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन लॉन्च
  • ३० दिवसांची वॅलिडीटी
  • जिओचा हा नवीन प्लॅन अवघ्या एक रुपयात मिळणार

जिओने कुठलाही गाजावाजा न करता सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. देशातील कुठल्याही नेटवर्क कंपनीने एवढा स्वस्तातला प्लॅन अजून दिलेला नाही. जिओचा हा नवीन प्लॅन अवघ्या एक रुपयात मिळणार आहे. तसेच ग्राहकांना या रिचार्जवर ३० दिवसांची वॅलिडीटीही मिणार आहे. 

जे ग्राहक जास्त डेटा असलेला प्लॅन विकत घेत नाहीत, त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे. जिओचा हा नवीन प्लॅन माय जिओ ऍप वर उपलब्ध आहे परंतु वेबसाईटवर नाही. भारतात सध्यातरी दुसरी टेलिकॉम कंपनी एक रुपयात कुठलाही प्लॅन ऑफर करत नाहिये. एक रुपयांच्या प्लॅन मध्ये ग्राहकांना १०० एमबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे.  हा १०० एमबी डेटा संपल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट मिळणार, परंतु स्पीड कमी होऊन ग्राहकांना 64Kbps स्पीड मिळेल. 

जिओचा नवीन रिचार्ज प्लॅन माय जिओ ऍपवर जाऊन Other Plans मध्ये गेल्यावर Value सेक्शनवर दिसेल. जर एक रुपयाचा रिचार्ज ग्राहकाने १० वेळा केला तर, ग्राहकाला एक जीबी डेटा मिळले. कंपनीकडे १५ रुपयांच्या प्लॅनमध्ये एक जीबी डेटा मिळतो. त्यामुळे १५ रुपयांच्या रिचार्जपेक्षा हा एक रुपयांचा प्लॅन ग्राहकांना अधिक स्वस्त पडेल.
 
ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी