Jio Recharge : सध्याच्या काळात बहुतेक युजर्सकडे स्मार्टफोन पहायला मिळतात. त्यातही जिओने स्वस्तात इंटरनेट प्लान उपलब्ध करुन सर्वांच्या मोबाइलमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी पहायला मिळू लागली. तुम्ही सुद्धा जिओ युजर्स आहात आणि तुम्हाला आणखी स्वस्त इंटरनेट, वॉईस कॉलिंगचा प्लान हवा असेल तर जिओचा नवा प्लान तुमच्या कामाचा आहे.
हे पण वाचा : या भाज्या खरेदी करायला जाल तर खिसा रिकामा कराल
जिओ कंपनीने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी नव-नवन रिचार्ज प्लान लॉन्च केले आहेत. जास्त काळाची वैधता हवी असेल तर अशा युजर्ससाठी जिओ कंपनीने अॅन्युअल प्लान लॉन्च केले आहेत. त्यातच कंपनीने आता एक नुकताच नवा रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची वैधता सुद्धा अधिक आहे आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सुद्धा आहे.
हे पण वाचा : गरोदरपणात मुळा खाण्याचे फायदे आणि नुकसान
जिओने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी एक नवा अॅन्युअल रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. कंपनीचा हा सर्वात स्वस्त अॅन्युअल रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये कंपनीकडून अनेक फायदे उपलब्ध करुन दिले जातात. खास बाब म्हणजे जिओच्या युजर्सला दररोज 5 रुपयांहून कमी किमतीत अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा मिळत आहे.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण 24 GB इंटरनेटचा लाभ मिळतो. या हिशोबाने युजर्सला प्रत्येक महिन्याला 2 GB इंटरनेटची सुविधा मिळते. याच्या व्यतिरिक्त प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये 336 दिवसांची वैधता मिळते. इतकेच नाही तर युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड यासारख्या सुविधांचा लाभ युजर्सला मिळणार आहे.