Worst passwords of 2020: 'हे' आहेत वर्ष 2020मधील सर्वात weak पासवर्ड, या लिस्टमध्ये तुमचा पासवर्ड तर नाही ना?

Weak passwords list released: 2020 हे वर्ष आता संपत आले आहे. या वर्षात सर्वात कमकुवत असलेल्या पासवर्ड्सची यादी आता समोर आली आहे. यामध्ये काही कॉमन पासवर्ड्स आहेत जे काही सेकंदात क्रॅक केले जाऊ शकतात.

Password
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : आपले आयुष्य सुलभ आणि सुखकर करण्यासाठी मनुष्य नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यातच टेक्नोलॉजीच्या या जगात सर्वकाही गोष्टी अगदी सोप्या होऊ लागल्या आहेत. इंटरनेट (Internet) आणि टेक्नोलॉजीच्या (Technology) या जगात सोशल मीडिया, मोबाइल फोनपासून बँक अकाऊंट्ससाठी सर्वचजण पासवर्ड ठेवतात. मोबाइल, ईमेल, सोशल मीडिया अकाऊंट्स, बँक एटीएम, नेट बँकिंगसह इतरही सुविधांचा लाभ घेण्यासाठी पासवर्ड्स (passwords) ठेवण्यात येतात. मात्र, इतक्या गोष्टींचे पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी काहीजण अगदी सोपे पासवर्ड ठेवतात. पण हेच पासवर्ड असुरक्षित असू शकतात. आता 2020 या वर्षातील सर्वात कमकुवत पासवर्ड्सची लिस्ट समोर आली आहे.

पासवर्ड मॅनेजर सोल्यूशन देणारी फर्म NordPassने 2020 या वर्षातील सर्वात कमकुवत/वीक पासवर्ड्सची लिस्ट जाहीर केली आहे. या पासवर्ड्स संदर्भात कंपनीने सांगितले की, हे पासवर्ड इतके कमकुवत आहेत की जे एका सेकंदाहून कमी वेळेत क्रॅक केले जाऊ शकतात. या वर्षातील सर्वात लोकप्रिय पासवर्ड्समध्ये 123456 आणि 123456789 हे आहेत. इतकेच नाही तर काहींनी iloveyou, picture1 आणि password सारखे पासवर्ड ठेवले आहेत जे अगदी सहजपणे क्रॅक होऊ शकतात. 

कमकुवत पासवर्ड्सच्या लिस्टमध्ये यांचाही समावेश 

NordPass कडून दरवर्षी कमकुवत पासवर्ड्सची एक यादी जाहीर करण्यात येते. त्याप्रमाणे यंदाही कंपनीने 200 अशा पासवर्ड्सची यादी जाहीर केली आहे जे खूपच कॉमन आहेत. हे पासवर्ड अगदी सहजपणे क्रॅक करुन सायबर हल्ल्याला युजर्स बळी पडू शकतात. या पासवर्ड्समध्ये 123455678, 111111, 123123 आणि 1234567890 यांचा समावेश आहे. यासोबतच पुढील पासवर्ड्सही मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहेत - 1234567, qwerty, abc123, Million2, 000000, 1234, aaron431, password1, qqww1122.

यामुळेच नागरिकांना नेहमी सल्ला दिला जातो की, तुमच्या बँकिंग, सोशल मीडिया अकाऊंट्स, एटीएम पासवर्ड, मोबाइल पासवर्ड तसेच इतर पासवर्ड हे सामान्य ठेवू नका. सोपे पासवर्ड ठेवल्यास सायबर गुन्हेगार ते अगदी सहज क्रॅक करतात आणि नागरिकांना गंडा घालतात. पासवर्ड ठेवताना मिक्स्ड कॅरेक्टर्सचा वापर करावा. यामध्ये एखादा अक्षर अप्पर केस, एखादा लोअर केस, स्पेशल कॅरेक्टर, अंक या सर्वांचे मिळून एखादा स्ट्राँग पासवर्ड तयार करावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी