Maruti Brezza CNG : मारुती सुझुकीचे CNG मॉडेल या तारखेला होणार लॉंच; जाणून घ्या अधिक माहिती

टेक इट Easy
Updated Jan 13, 2022 | 18:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

2022 Maruti Brezza CNG | भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक करणारी कंपनी मारुती सुझुकी सीएनजी सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. मारुतीने भारतीय बाजारपेठेत अनेक सीएनजी वाहने आणली आहेत, ज्यांची मागणी प्रचंड प्रमाणात आहे. कंपनी अल्टो, एस-प्रेसो, वॅगनार आणि अर्टिगाच्या सीएजनजी आवृत्त्यांची विक्री करत आहे.

Maruti Suzuki's CNG model will be launched at the end of January
मारुती सुझुकीचे CNG मॉडेल या तारखेला होणार लॉंच  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक करणारी कंपनी मारुती सुझुकी सीएनजी सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे.
  • मारूती सुझुकी डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी फ्लेक्स-फ्यूल आणि हायब्रिड पॉवरट्रेनची चाचपणी करत आहे.
  • याच महिन्याच्या शेवटी पर्यंत नव्या सीएनजी मॉडेलचे बाजारात आगमन होणार आहे.

2022 Maruti Brezza CNG | नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक करणारी कंपनी मारुती सुझुकी सीएनजी सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. मारुती कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक सीएनजी वाहने आणली आहेत, ज्यांची मागणी प्रचंड प्रमाणात आहे. कंपनी अल्टो (Alto), एस-प्रेसो S-Presso, वॅगनार (WagonR) आणि अर्टिगा (Ertiga) च्या सीएजनजी (CNG) आवृत्त्यांची विक्री करत आहे. दरम्यान याच महिन्याच्या शेवटी पर्यंत नव्या सीएनजी मॉडेलचे बाजारात आगमन होणार आहे. यासोबतच कंपनी स्विफ्ट आणि डिजायरच्या (Swift And Dzire) देखील सीएनजी आवृत्तीची चाचपणी करत आहे. दरम्यान लक्षणीय बाब म्हणजे मारूती नवीन ब्रेझाचे देखील सीएनजी मॉडेल बनवले जाणार आहे, ज्याला एप्रिल २०२२ पर्यंत लॉंच करण्यात येईल. (Maruti Suzuki's CNG model will be launched at the end of January). 

Read Also : मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून कामगाराला बेदम मारहाण

मारूती सुझुकी डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी फ्लेक्स-फ्यूल आणि हायब्रिड पॉवरट्रेनची चाचपणी करत आहे. कंपनीकडे लवकरच भविष्यात प्रत्येक मॉडेलसाठी सीएनजी आवृत्ती उपलब्ध असेल. सीव्ही रमन, सीटीओ, एमएसआयएल यांनी सांगितले की, "सीएनजीवर चालणारी गाडी अन्य फ्यूल पर्यायांच्या बाबतीत सर्वात स्वस्त पर्याय म्हणून उपलब्ध आहे. मारुती सुझुकी देखील विटारा ब्रेझाला (Vitara Brezza) एक मोठे अपडेट देणार आहे. कंपनी 'विटारा' नाव काढून टाकेल आणि सर्व ४ मीटर एसयूव्हीला मारूती ब्रेझा बोलले जाईल. दरम्यान २०२२ मध्येच मारूती ब्रेझा सीएनजी पेट्रोल आवृत्ती सोबत समोर येण्याची संभावना आहे. 

२०२२ मारूती ब्रिजामध्ये १.५ लीटर K15B पेट्रोल इंजिन दिले जाईल जे १०४bhp आणि १३८Nm टॉर्क निर्माण करते. त्याच पॉवरट्रेनसह सीएनजी व्हेरिएंट ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. तसेच पॉवर आणि टॉर्कमध्ये किंचित घट होईल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी