Internet Explorer : इंटरनेट एक्सप्लोरर १५ जून २०२२ रोजी कायमचे बंद होणार

Microsoft is shutting down Internet Explorer after 27 years; 90s users get nostalgic : मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर १५ जून २०२२ रोजी कायमचे बंद होणार.

Microsoft is shutting down Internet Explorer after 27 years; 90s users get nostalgic
Internet Explorer : इंटरनेट एक्सप्लोरर १५ जून २०२२ रोजी कायमचे बंद होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Internet Explorer : इंटरनेट एक्सप्लोरर १५ जून २०२२ रोजी कायमचे बंद होणार
  • विंडोज १० (Windows 10) मध्ये मायक्रोसॉफ्ट एग्ज हे वेब ब्राउझर
  • सोशल मीडियावर इंटरनेट एक्सप्लोरर संदर्भात आठवणी सांगणाऱ्या पोस्टचा पूर

Microsoft is shutting down Internet Explorer after 27 years; 90s users get nostalgic : मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर १५ जून २०२२ रोजी कायमचे बंद होणार. मायक्रोसॉफ्ट कंपनीने २०१६ पासूनच इंटरनेट एक्सप्लोरर अपडेट करणे थांबवले आहे. यानंतर १७ ऑगस्ट २०२१ रोजी 'मायक्रोसॉफ्ट ३६५'ने (Microsoft 365) आणि ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मायक्रोसॉफ्ट टीम्सने (Microsoft Teams) इंटरनेट एक्सप्लोररला तांत्रिक मदत देणे थांबवले. आता १५ जून २०२२ रोजी इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर औपचारिकरित्या कायमचे बंद होणार आहे. इंटरनेट एक्सप्लोरर बंद होत असल्यामुळे सोशल मीडियावर इंटरनेट एक्सप्लोरर संदर्भात आठवणी सांगणाऱ्या पोस्टचा पूर आला आहे.

बाय बाय इंटरनेट एक्सप्लोरर

मायक्रोसॉफ्ट एग्ज (Microsoft Edge) या नव्या वेब ब्राउझरसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी इंटरनेट एक्सप्लोरर बाजारात आले त्यावेळची परिस्थिती आणि आताची स्थिती यात फरक आहे. नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एग्ज डिझाइन केले आहे. इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउझर तयार करताना एवढा पुढचा विचार केला नव्हता आणि आता हे ब्राउझर नव्या काळाला अनुरुप असे अपडेट करणे कठीण आहे. यामुळेच इंटरनेट एक्सप्लोरर बंद करण्याचा आणि मायक्रोसॉफ्ट एग्ज (Microsoft Edge) बदलत्या काळानुरुप अपडेट ठेवण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेतला आहे.

इंटरनेट एक्सप्लोररचे दिवस

डेस्कटॉप कॉम्प्युटरवर इंटरनेट वापरायचे म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर हवेच अशा स्वरुपाचे समीकरण ९०च्या दशकात झाले होते. हे वेब ब्राउझर १९९५ मध्ये 'विंडोज ९५' (Windows 95) सोबत देण्यात आले. यानंतर मायक्रोसॉफ्टच्या प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टिमसोबत इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउझर देण्यास सुरुवात झाली. अल्पावधीत विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि त्याच्या सोबत मिळणारे इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउझर हे सर्वत्र दिसू लागले. डेस्कटॉप कॉम्प्युटरच्या बाजारात मायक्रोसॉफ्ट कंपनीची एकाधिकारशाही निर्माण झाल्याचे चित्र होते. उपलब्ध आकडेवारीनुसार २००३ मध्ये जगातील ९५ टक्के डेस्कटॉप कॉम्प्युटरवर इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर वापरले जात होते. यानंतर स्पर्धक कंपन्यांच्या नवनव्या ब्राउझरशी स्पर्धा करताना इंटरनेट एक्सप्लोरर तांत्रिक बाबतीत हळू हळू मागे पडले. डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीची ऑपरेटिंग सिस्टिम वापरत असले तरी इंटरनेट ब्राउझिंगसाठी स्पर्धक कंपन्यांचे ब्राउझर वापरणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. नव्याने निर्माण होत असलेल्या आव्हानांना सामोरे जाणे इंटरनेट एक्सप्लोररला कठीण जात असल्याचे स्पष्ट होत गेले आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीने मायक्रोसॉफ्ट एग्ज या नव्या ब्राउझरच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले. टप्प्याटप्प्याने इंटरनेट एक्सप्लोरर बंद करायचे असे ठरले आणि प्रक्रिया सुरू झाली. 

मायक्रोसॉफ्ट एग्ज ब्राउझरमध्ये आयई मोड

विंडोज १० (Windows 10) मध्ये मायक्रोसॉफ्ट एग्ज हे वेब ब्राउझर आहे. आता पुढे मायक्रोसॉफ्ट कंपनी एग्जचाच विचार करणार आहे. इंटरनेट एक्सप्लोरर बंद करत आहोत, अशी माहिती मायक्रोसॉफ्ट एग्जचे प्रोग्रॅम मॅनेजर सीन लिंडर्से यांनी दिली. मायक्रोसॉफ्ट एग्ज हे वेब ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोररच्या तुलनेत वेगवान, आधुनिक, सुरक्षित, वापरण्यासाठी सोपे असे ब्राउझर आहे. इंटरनेट एक्सप्लोररमध्ये आढळलेल्या सर्व तांत्रिक दोषांना एग्ज तयार करताना दूर केले आहे; असे सीन लिंडर्से म्हणाले. मायक्रोसॉफ्ट एग्ज ब्राउझरमध्ये आयई (इंटरनेट एक्सप्लोरर) नावाचा एक मोड अर्थात पर्याय दिला आहे. यामुळे ज्या वेबसाइट जुन्या आहेत आणि इंटरनेट एक्सप्लोररवरच बघणे सोपे आहे अशा वेबसाईट बघणे सोयीचे होईल. नव्या आधुनिक वेबसाईट बघण्याकरिता एग्ज हा आधुनिक पर्याय आहेच.

ज्यांनी विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात किंवा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षात इंटरनेट वापरणे सुरू केले त्यांना इंटरनेट एक्सप्लोरर माहिती आहे. नव्या पिढीला एग्ज माहिती आहे. इंटरनेट एक्सप्लोररचे अकरावे व्हर्जन विंडोज १० सोबत उपलब्ध आहे. हे व्हर्जन १५ जून २०२२ पासून कायमचे बंद होईल. याची जागा मायक्रोसॉफ्ट एग्ज हे वेब ब्राउझर घेणार आहे.

इंटरनेटच्या विश्वाचे प्रवेशद्वार

अनेकांसाठी इंटरनेट एक्सप्लोररने इंटरनेटच्या विश्वाचे प्रवेशद्वार खुले केले. यामुळे त्यांच्या इंटरनेट एक्सप्लोररसोबत असंख्य आठवणी आहेत. पण काळासोबत बदलावे लागते. याची सर्वांनाच जाणीव आहे यामुळे ज्यांनी इंटरनेट एक्सप्लोरर वापरले ते सुद्धा हळू हळू मायक्रोसॉफ्ट एग्ज वापरू लागतील, असा विश्वास मायक्रोसॉफ्ट एग्जचे प्रोग्रॅम मॅनेजर सीन लिंडर्से यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी