पृथ्वीसाठी धोक्याची घंटा? सूर्यावर रहस्यमय डागाचा आकार वेगाने वाढतोय, दोन दिवसांत 10 पटीने वाढला सनस्पॉट

Mysterious sunspot: सनस्पॉटच्या आसपास अनेक सौर लहरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे स्फोट सूर्याच्या पृष्ठभागावरुन बाहेर पडतात आणि अवकाशात पसरत असल्याचं दिसून आलं आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सूर्यावरील रहस्यमय डागाचा आकार दिवसेंदिवस वाढतोय 
  • दोन दिवसांत डागाचा आकार मोठ्याने वाढल्याने चिंता वाढली
  • पृथ्वीसाठी धोक्याची घंटा आहे का? 

spot on sun planet latest news: आपल्याला प्रकाश देणाऱ्या सूर्यावर एक मोठा डाग (सनस्पॉट) आढळून आला आहे. शास्त्रज्ञांना हा सनस्पॉट आढळून आला असून त्याचा चेहरा पृथ्वीच्याच दिशेने असल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर, या सनस्पॉटमधून भयंकर सौरऊर्जा उत्सर्जित होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. सूर्याच्या या सक्रिय क्षेत्रात म्हणजेच अ‍ॅक्टिव्ह झोनमध्ये असलेल्या या सनस्पॉटचे नाव AR3085 आहे. हा सनस्पॉट तात्पूरता होता मात्र, आता त्याचा आकार 10 पटीने वाढल्याने चिंता वाढली आहे. (mysterious spot on sun planet growing rapidly sunspot grows 10 times in two days is this alarm bell for earth)

या सनस्पॉटच्या आकारात मोठ्या प्रमाणात आणि आश्चर्यकारक अशा पद्धतीने वाढ झाली आहे. अनेक सौर लहरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे स्फोट सूर्याच्या पृष्ठभागावरुन बाहेर पडतात आणि अवकाशात पसरत असल्याचं दिसून आलं आहे. स्पेस वेदरने या संदर्भात रिपोर्ट दिला आहे. तर नासाच्या मते, एम-क्लास लहरी खूपच शक्तिशाली आहेत आणि पृथ्वीवर रेडिओ ब्लॅकआऊटला कारणीभूत ठरू शकतात.

अधिक वाचा : 3D House: अशीही भन्नाट टेक्नॉलॉजी; 24 तासांत प्रिंट होईल 3D घर, जाणून घ्या किंमत आणि बरंच काही...

सनस्पॉटचा धोका किती? 

सूर्यावर आढळून आलेला असलेला हा डागावरील एक्स-क्लास लहरी सर्वात शक्तिशाली आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रेडिओ ब्लॅकआऊट होऊ शकतो. इतकेच नाही तर पृथ्वीवर उपग्रह आणि पॉवर ग्रीडचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. लाइव्ह सायन्सच्या वृत्तानुसार, येत्या काही दिवसांत हा डाग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हा डाग वाढण्याच्या सोबतच त्यातून शक्तिशाली लहरी बाहेर पडतील आणि या लहरी पृथ्वीच्या दिशेने येऊ शकतात. उपग्रह तसेच इतर कम्युनिकेशन सिस्टमसाठी ही एक धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे. मात्र, सध्या तरी या सनस्पॉटचा पृथ्वीवरील लोकांना कोणताही धोका नाहीये.

हा सनस्पॉट आहे तरी काय? 

अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल की, हा सनस्पॉट नेमका काय आहे? तर सनस्पॉट म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर गडद दिसणारा एक ठराविक भाग आहे. हाडाग काळ्या रंगाचा आहे. नासाच्या मते, सौर लहरी ऊर्जेचा अचानक स्फोट होतो आणि जो सूर्याच्या ठिपक्यांजवळील चुंबकीय क्षेत्र रेषांमध्ये अडकल्यामुळे उद्भवत असल्याचं बोललं जात आहे. स्फोट झाल्यावर यातून दशलक्ष मैलाच्या वेगाने जवळपास एक अब्ज टन पदार्थ अंतराळातून येऊ शकतात असंही म्हटलं जात आहे. 

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी