Mars Rover near Aliens : एलियन्सच्या भेटीची वेळ येतेय जवळ, उरलं केवळ काही फुटांचं अंतर

या जगात एलियन्स आहेत की नाहीत, याचं उत्तर आता काही दिवसांतच मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी नासाकडून मंगळ ग्रहावर खोदकाम सुरू करण्यात आलं आहे.

Mars Rover near Aliens
एलियन्सच्या भेटीची वेळ येतेय जवळ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मंगळ ग्रहावर एलियन्स आहेत की नाहीत?
  • लवकरच मिळणार उत्तर
  • नासाकडून मंगळ ग्रहावर सुरू आहे खोदकाम

Mars Rover near Aliens | पृथ्वीबाहेरच्या जगाविषयी ज्या ज्या गोष्टी जाणून घेण्यात सर्वसामान्य माणसाला रस असतो, त्यातील सर्वात मोठी बाब म्हणजे एलियन्स. जगात एलियन्स आहेत की नाहीत, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. आतापर्यंत अनेकांनी एलियन्स असल्याचा दावा केला आहे. काहीजणांनी एलियन्सचे फोटो टिपल्याचाही दावा केला आहे. मात्र आजवर एकही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही. त्यामुळे पृथ्वीबाहेरच्या जगात खरोखरच एलियन्स आहेत की नाहीत, याचं ठोस उत्तर अद्याप वैज्ञानिक देऊ शकलेले नाहीत. आता मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नासाचं मंगळ यान लावणार शोध

नासानं केलेल्या दाव्यानुसार मंगळावर पाठवलेलं यान लवकरच एलियन्सबाबत काही ठोस माहिती पुरवू शकणार आहे. एलियन्सपासून केवळ सात फूट अंतरावर हे संशोधन पोहोचलं असून लवकरच याबाबतची माहिती जाहीर केली जाऊ शकते. मंगळ ग्रहावर पाठवलेला रोव्हर सध्या याच गोष्टीचा शोध घेत आहे. त्यासाठी मंगळाच्या पृष्ठभागावर सात फूट खोदकाम केलं जात आहे. जेव्हा हे खोदकाम पूर्ण होईल, तेव्हा एलियन्सच्या अस्तित्वाबाबतची ठोस माहिती समोर येऊ शकेल, असा दावा नासानं केला आहे. 

अधिक  वाचा - Copenhagen shootings : डेन्मार्कच्या शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार, 3 जणांचा मृ्त्यू, अनेकजण जखमी

प्रोटिनची प्रतीक्षा

प्रोटिन तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ॲमिनो ॲसिडची यासाठी मदत घेतली जाणार आहे. त्याच्या मदतीने सात फुटांचं खोदकाम पूर्ण झाल्यावर हे प्रोटिन सापडतील, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. या प्रोटिनचं पृथक्करण करून मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचा अंदाज घेता येईल आणि त्याबाबत काही ठोस माहिती मिळू शकणार आहे. आतापर्यंत या रोव्हरने 6 फूट खोदकाम पूर्ण केलं आहे आणि अजून एक फूट खोदकाम बाकी आहे. 

अधिक  वाचा - BJP National Executive Meet: पुढील 30 ते 40 वर्षं देशभर भाजपचाच गवगवा, गृहमंत्री अमित शाहांचा दावा, भारत होणार विश्वगुरू

जीवसृष्टी आहे की नाही?

मंगळ ग्रहावर पाणी सापडल्यामुळे तिथे जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती. जर जीवसृष्टी असेल, तर ती नेमक्या कुठल्या स्वरुपाची आहे, याबाबत शास्त्रज्ञांना उत्सुकता आहे. नेमके कुठले प्राणी त्या ग्रहावर असतील, त्यांची बौद्धिक क्षमता कशी असेल, मानवाप्रमाणं उत्क्रांती झालेला एखादा प्राणी तिथे असेल का, जीवसृष्टीचा शोध लागल्यावर पुढे काय होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रयोगाच्या यशापयशावर अवलंबून असणार आहेत. त्यामुळे सध्या सर्व विज्ञानप्रेमींचं लक्ष या खोदकामाकडे लागलं आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं आणि मंगळावर एलियन्स असण्याची शक्यता आहे की नाही, याचं उत्तर मिळण्यासाठी आता काही दिवसच उरले आहेत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी