NASA Controversy : चंद्रावरील माती आणि झुरळांच्या सांगाड्यावरून वाद, थेट NASA नेच घेतला आक्षेप; ही आपली संपत्ती असल्याचा दावा

चंद्रावरील माती खाल्ल्याचा प्राण्यांवर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावरून माती आणली होती. या मातीचा लिलाव करण्यास नासाने आक्षेप घेतला आहे.

NASA Controversy
चंद्रावरील माती आणि झुरळांच्या सांगाड्यावरून वाद  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • चंद्रावरील माती आणि झुरळांचा लिलाव करायला 'नासा'चा आक्षेप
  • प्राण्यांवर प्रयोग करण्यासाठी आणली होती माती
  • झुरळांना आणि माशांना खाऊ घातली माती

NASA Controversy | बोस्टनमध्ये सध्या एका वेगळ्याच विषयावरून वाद रंगला आहे. चंद्रावरून आणलेली माती आणि ही माती खालेल्ली काही झुरळं यांचं ऑक्शन करण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऑर्गनायझेशन अर्थात नासानं याचा लिलाव करायला आक्षेप घेतला आहे. ज्या वस्तू संशोधनासाठी आणण्यात आल्या होत्या, त्या वस्तूंवरील संपूर्ण अधिकार हा आपलाच असल्याचा दावा नासानं केला आहे. त्यामुळे या वस्तूंचीा लिलाव करण्याचा अधिकार इतर कुठल्याही संस्थेला नसल्याचं नासाचं म्हणणं आहे. 

काय आहे प्रकरण?

बॉस्टनमधील ‘आर आर ऑक्शन’ या कंपनीनं ‘1969 अपोलो 11’ या अभियानांतर्गत चंद्रावरून पृथ्वीवर आणण्यात आलेल्या मातीचं ऑक्शन करण्याचा निर्णय घेतला होता. आर. आर. ही एक प्रसिद्ध ऑक्शन करणारी संस्था असून जगभरातील अनेक मौल्यवान वस्तूंचा लिलाव करण्याचं काम ही कंपनी करत असते. पृथ्वीवरील जीवजंतू आणि किडेमुंग्यांना चंद्रावरील मातीपासून काही धोका उत्पन्न होऊ शकतो का, याचा आढावा घेण्यासाठी ही माती आणण्यात आली होती. चंद्रावरील मातीत पॅथोजन हा घटक असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. जर पॅथोजन असेल, तर ही माती खाल्ल्यानंतर प्राण्यांचा मृत्यू होतो. मात्र प्रत्यक्षात चंद्रावरील मातीत पॅथोजन आहे की नाही, याची खातरजमा करणे, हा शास्त्रज्ञांचा उद्देश होता. 

झुरळांना खाऊ घातली माती

ही माती झुरळांना आणि इतर  काही किटकांना खाऊ घालण्यात आली होती. त्यानंतर या झुरळांना तपासणीसाठी आणि निरीक्षणासाठी प्रयोगशाळेत ठेवण्यात आलं होतं. चंद्रावरील माती खाऊन या झुरळांना काहीच फरक पडला नाही. इतर कीटकही मरण पावले नाहीत. त्यामुळे चंद्रावरील माती ही पृथ्वीवरील जीवांसाठी सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं होतं. 

आणली होती 21 किलो माती 

पृथ्वीवरील जीव आणि मासे चंद्रावरील माती पोटात गेल्यावर कसे रिॲक्ट करतात, हे तापसून पाहण्यासाठी चंद्रावरून 21.3 किलो माती आणण्यात आली होती. या मातीचा पृथ्वीवरील जीवांवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी ती झुरळांना आणि माशांना खाऊ घालण्यात आली होती. 

अधिक वाचा - Mobile Internet: भारतात ४ जी नेटवर्क असूनही इंटरनेट स्पीड २जी स्पीड का? या पाच कारणांमुळे कमी होतोय स्पीड

सामाजिक कार्यासाठी होणार होता लिलाव

त्याचा कुठलाही विपरित परिणाम या प्राण्यांवर न झाल्यामुळे हा प्रयोग थांबवण्यात आला होता. त्यानंतर उरलेल्या मातीचं ऑक्शन करून काही पैसे गोळा करावेत आणि त्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करावा, असा या संस्थेचा उद्देश होता. ज्या झुरळांवर हा प्रयोग करण्यात आला होता, त्यांच्या सांगाड्यांचाही यात समावेश होता. मात्र नासानं या लिलावाला आक्षेप घेतल्यामुळे संस्थेनं लिलावाच्या यादीतून या गोष्टी आता वगळल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी