Terrific Photos by NASA : आज मै उपर, आसमां निचे! नासाने पोस्ट केले आजवरचे सर्वात खतरनाक फोटो

नासानं आजवरचे सर्वात खतरनाक फोटो पोस्ट केले आहेत. अंतराळवीर आपलं यान सोडून काही अंतरावर अंतराळात मुक्तपणे संचार करतानाचे हे फोटो आहेत.

Terrific Photos by NASA
नासने पोस्ट केले आजवरचे सर्वाधिक खतरनाक फोटो  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • आजवरचे सर्वात खतरनाक फोटो
  • अंतराळवीराचा अंतराळात मुक्त विहार
  • चार दशकांपूर्वीचे फोटो व्हायरल

Terrific Photos by NASA | अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने आजवरचे सर्वात खतरनाक फोटो पोस्ट केले आहेत. आजवर नासा त्यांच्या वेगवेगळ्या मोहिमांमधील वैशिष्ट्यपूर्ण फोटो पोस्ट करतच असते. मात्र यावेळी नासानं पोस्ट केलेले फोटो हे आजवरचे सर्वात खतरनाक फोटो असल्याचं मानलं जात आहे. 

1984 सालचे फोटो

नासानं पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये एक अंतराळवीर आपल्या यानातून बाहेर येऊन अंतरिक्षात अक्षरशः पोहत असल्याचं यात दिसतं. अंतराळात प्रवास करणारे अंतराळवीर हे याातून प्रवास करत असतात. शक्यतो तो यानाच्या बाहेर पडत नाहीत. मात्र या व्हिडिओत एक अंतराळवीर आपलं यान योडून काही अंतरावर अलगद तरंगत असताना दिसत आहे. या अंतराळवीराच्या पायाशी निळीशार पृथ्वी या फोटोंमध्ये दिसते. हा फोटो जवळपास चार दशकं जुना आहे. नासानं फेब्रुवारी 1984 मध्ये हा फोटो टिपला होता. एका मोहिमेदरम्यान अंतराळवीरानं यानातून बाहेर पडून अंतराळात डुंबण्याचा पराक्रम होता. ही घटना नासानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. 

महाकठीण गोष्ट

मॅककँडलेस या अंतराळवीरानं अंतराळात तरंगण्याचा सर्वप्रथम विक्रम केला. यान सोडून अंतराळात उडी मारणं आणि तरंगत राहणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. नासानं या फोटोला ‘फ्री फ्लोटिंग’ असं नाव दिलं आहे. या अंतराळवीराच्या पाठीवर असणाऱ्या ‘जेट पॅक’मुळेच हे शक्य झालं, असं नासानं म्हटलं आहे. या यंत्राला मॅन मॅन्युव्हरिंग युनीट असं म्हटलं जातं. 

मॅककँडलेसनं स्पेस क्राफ्टपाशी 136 पाउंडची टेस्ट केली. त्यानंतर ते यानापासून तब्बल 320 फूट अंतरावर मुक्त विहार करताना दिसले. कुठलीही तार, दोरी किंवा वायर यांचा आधार न घेता स्वैर विहार करण्याचा रेकॉर्ड मॅककँडलेस यांच्याच नावावर जमा झाला आहे. MMU हा नायट्रोजनवर चालणारा जेटपॅक असतो. यामुळे अंतराळवीरांना हव्या त्या दिशेला सरकणं शक्य होतं. 21 डिसेंबर 2017 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी मॅककँडलेस यांंचं निधन झालं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी