New Whatsapp Feature : आता व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनना मिळणार जास्तीचे अधिकार, लवकरच येतंय नवं फीचर

व्हॉट्सअपच्या नव्या फिचरमुळे आता ॲडमिनचं महत्त्व आणखीनच वाढणार आहेत. यापुढे ॲडमिनला असलेल्या अधिकारात वाढ होणार आहे.

New Whatsapp Feature
आता व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन्सना मिळणार जास्त अधिकार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • व्हॉट्सअपवर येतंय नवं फिचर
  • ॲडमिन डिलिट करू शकतो कुठल्याची मेंबरची पोस्ट
  • लवकरच सामान्य युजर्ससाठी लॉन्च होण्याची शक्यता

New Whatsapp Feature : जगातील अनेक देशांमध्ये व्हॉट्सअप हे मेसेजिंग ॲप (Whatsapp messaging app) लोकप्रिय आहे. त्यातील अनेक लोकोपयोगी फिचर्स  (Features) आणि त्याच्या सहजसोप्या ऑपरेटिंग पद्धतीमुळे हे ॲप गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. वेळोवेळी कंपनीनं याच्या सुविधेमध्ये बदल (Changes) आणि सुधारणा केल्यामुळे ग्राहकांना नेमकं काय हवं आहे, याचा विचार कंपनी किती नेमकेपणाने करते, हे वेळोवेळी दिसून आलं आहे. आतापर्यंत केलेल्या अनेक बदलानंतर कंपनीनं आता आणखी एक नवं फीचर आणण्याचा विचार केला आहे. या फिचरनुसार आता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये (Whatsapp Group) कुठल्याही मेंबरनं (Group Member) टाकलेला मेसेज ग्रुपचा ॲडमिन सर्वांसाठी डिलिट करू शकणार आहे. 

ॲडमिनला अधिक अधिकार

एखाद्या ग्रुपवर टाकलेला मेसेज जर आक्षेपार्ह असेल, तर त्या ज्याने तो मेसेज टाकला आहे, त्याला तो डिलिट करता येतो. स्वतःपुरता डिलिट करणे आणि सर्वांसाठी डिलिट करणे असे दोन्ही पर्याय त्याला मिळतात. मात्र अनेकदा एखादा ग्रुप मेंबर त्याच्या भूमिकेवर ठाम राहतो आणि तो मेसेज डिलिट करण्यास नकार देतो. ग्रुप ॲडमिनच्या सूचनेनंतरही तो आक्षेपार्ह मेसेज त्या ग्रुपवर तसाच राहतो आणि त्यामुळे ग्रुपमधील मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. याचाच विचार करून हे नवं फिचर आणण्यात येतंय. आता कुठल्याही ग्रुप मेंबरने टाकलेला मेसेज सर्वांसाठी डिलिट कऱण्याचा अधिकार ग्रुप ॲडमिनकडे असणार आहे. ग्रुपवर हा मेसेजे ॲडमिनकडून डिलिट करण्यात आला आहे, असा संदेशही सर्वांना दिसेल. 

अधिक वाचा - Mobile Charging : रात्रभर मोबाईल चार्जिंग ठेवलं सुरू, झोपेतच झाला तरुणीचा मृत्यू

बिटा टेस्टिंगला सुरुवात

व्हॉट्सअपनं हे फिचर सध्या बिटा टेस्टरसाठी सुरु केलं आहे. कुठलंही नवीन फिचर बाजारात आणण्यापूर्वी ते प्रायोगिक तत्त्वावर राबवलं जातं. त्यासाठी व्हॉट्सअपनं काही बिटा युजर्स नेमलेले असतात. अगोदर त्यांच्यासाठी हे फिचर उपलब्ध करून दिलं जातं. काही दिवस हे फिचर वापरल्यानंतर त्याची त्रुटी किंवा अधिक सुधारणांची गरज समोर येते. मग त्या सुधारणांसह आणखी मोठ्या संख्येनं असणाऱ्या बिटा युजर्सना ते फिचर वापरण्यासाठी दिलं जातं. त्यानंतर पुन्हा ज्या सूचना येतात, त्यांचा समावेश करून मगच ते फिचर बाजारात सर्वसामान्य युजर्ससाठी आणलं जातं. 

अधिक वाचा - Tata Motors : टाटांची ही सर्वात स्वस्त कार लवकरच होणार लॉंच...लक्ष वेधून घेणाऱ्या या कारची किंमतही असणार बजेटमध्ये

लवकर येणार बाजारात

सध्या टेस्टिंगच्या प्राथमिक पातलीवरून हे फिचर जात असून लवकरच त्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि ते बाजारात सर्वांना उपलब्ध होईल, अशी माहिती आहे. अर्थात, व्हॉट्सअपकडून अद्याप या फिचरबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या फिचरमुळे ॲडमिनच्या अधिकारांमध्ये वाढ होणार आहे. जर एखादा मेसेज ॲडमिनला आवडला नाही किंवा व्हॉट्स अप पॉलिसीच्या नियमात बसणारा नसेल, तर यापुढे ॲडमिन स्वतःच तो मेसेजे डीलिट करू शकणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी