आता आली Airbag वाली मोटरसायकल, रिव्हर्स गियर सह 7-स्पीड DTCचा पर्याय

Honda Gold Wing Tour Launched : ही Honda मोटरसायकल गनमेटल ब्लॅक मेटॅलिक (ब्लॅक-आउट इंजिन फिनिशसह) फक्त एकाच रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. ज्यामध्ये कंपनीने 1833cc चे लिक्विड-कूल्ड, फ्लॅट-सिक्स इंजिन दिले आहे.

Now comes the 7-speed DTC option with Airbag motorcycle, reverse gear
आता आली Airbag वाली मोटरसायकल, रिव्हर्स गियर सह 7-स्पीड DTCचा पर्याय 
थोडं पण कामाचं
  • Honda Motorcycle and Scooter India ने भारतीय बाजारपेठेत 2022 गोल्ड विंग टूर लॉन्च केली आहे.
  • नवीन गोल्ड विंग टूरची किंमत 39.20 लाख रुपये आहे.
  • Honda ने 2022 गोल्ड विंग टूर DCT साठी एअरबॅग पर्यायासह बुकींग घेणे देखील सुरु केले आहे.

मुंबई : Honda Motorcycle and Scooter India ने आज भारतात 2022 Gold Wing Tour लाँच केली आहे, अतिशय आकर्षक स्टाइल आणि मजबूत पॉवरने सुसज्ज, या बाईकची किंमत 39.20 लाख (एक्स-शोरूम, गुरुग्राम) निश्चित करण्यात आली आहे. गुडगाव, मुंबई, बंगळुरू, इंदूर, कोची, हैदराबाद आणि चेन्नई येथील विशेष बिगविंग टॉपलाइन डीलरशिपवर एअरबॅग पर्यायासह होंडागोल्ड विंग टूरर-मोटारसायकलची बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. (Now comes the 7-speed DTC option with Airbag motorcycle, reverse gear)

अधिक वाचा : लाखो Chrome वापरकर्ते धोक्यात! गुगलने दिला इशारा, युजर्सनी त्वरित करावं हे काम

रिव्हर्स गियरसह 7 स्पीड DCT

होंडा गोल्ड विंग मोटरसायकल गनमेटल ब्लॅक मेटॅलिक (ब्लॅक-आउट इंजिन फिनिशसह) या एकाच रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. ज्यामध्ये कंपनीने 1833cc चे लिक्विड-कूल्ड, फ्लॅट-सिक्स इंजिन दिले आहे, जे 126 hp (5500 rpm वर) पॉवर आणि 170 Nm (4500 rpm वर) कमाल टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. गिअरबॉक्स म्हणून बाईकमध्ये 7-स्पीड DCT समाविष्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये रिव्हर्स गियर देखील देण्यात आला आहे.

अधिक वाचा : Maruti Suzuki Update | कार विकत घेतांय? मारुती सुझुकीच्या वाहनांच्या किंमतीत 18 एप्रिलपासून वाढ...पाहा किती होणार वाढ

एअरबॅग पर्याय

ही टूरर बाइक चार राइडिंग मोडमध्ये (टूर, स्पोर्ट, इकॉन आणि रेन) विक्रीसाठी उपलब्ध असेल. मोटारसायकलला पुढील बाजूस दुहेरी-विशबोन सस्पेंशन सेटअप आहे, तसेच मागील बाजूस प्रो-लिंक सस्पेंशन आहे आणि ती अॅल्युमिनियम (डाय-कास्ट) ट्विन-ट्यूब फ्रेमवर बांधलेली आहे. टूरर बाईक हिल स्टार्ट असिस्ट (HSA), होंडाचे ड्युअल क्लच ट्रान्समिशन (DCT) तंत्रज्ञान, ड्युअल कम्बाइंड ब्रेक सिस्टम (D-CBS), ABS आणि एअरबॅगसह येते.

अधिक वाचा : अपडेटेड 'एर्टिगा' चे काय आहेत फिचर्स अन् काय आहे किंमत; जाणून घ्या जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळी?
अनेक कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये 

बाईकच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये 7-इंचाचा TFT MID (इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्ये), इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्लायस्क्रीन, ऑल-एलईडी लाइटिंग, ऑटो-कॅन्सलिंग इंडिकेटर, क्रूझ कंट्रोल, स्मार्ट की आणि ऑन-बोर्ड ऑडिओ यांचा समावेश आहे. याशिवाय, नेव्हिगेशन सिस्टम आणि gyrocompass, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, Apple CarPlay, Android Auto आणि USB Type-C पोर्टसह बरेच कनेक्टिव्हिटी पर्याय देखील उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी