भारताचा चीनवर पुन्हा डिजिटल स्ट्राईक; 232 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी

Chinese apps ban: भारत सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक करत चीनला झटका दिला आहे. डिजिटल स्ट्राईक करत भारताने 232 अ‍ॅप्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

one more digital strike from India against china ban block 138 betting apps and 94 loan lending apps with Chinese links
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत सरकारचा आणखी एक मोठा निर्णय 
  • चीनवर पुन्हा डिजिटल स्ट्राईक
  • चीनशी संबंधित 232 अ‍ॅप्सवर बंदी

Indian Government blocks 232 apps: भारत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेत 232 अ‍ॅप्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व अ‍ॅप्स जुगार, सट्टा आणि अनधिकृत कर्ज देणाऱ्यांच्या संबंधित आहेत. हे सर्व अ‍ॅप्स चीनमधून चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. (one more digital strike from India against china ban block 138 betting apps and 94 loan lending apps with Chinese links)

भारत सरकारने 138 सट्टा लावणारे अ‍ॅप्स आणि 94 लोन देणारे अ‍ॅप्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात हे अ‍ॅप्स ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तात्काळ 138 बेटिंग चायनीज अ‍ॅप्स आणि 94 लोन देणाऱ्या चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचं, ब्लॉक करण्याचं काम सुरू केलं.

म्हणून अ‍ॅप्सवर बंदी

हे सर्व अ‍ॅप्स चीन सोबतच इतर परदेशी संस्थांमार्फत चालवण्यात येत होते. सरकारच्या मते, हे अ‍ॅप्स बंद करण्यात आले आहेत कारण, हे देशाची आर्थिक स्थिरतासाठी धोका निर्माण करत होते. सरकारने 232 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे त्यात कोणत्या अ‍ॅप्सचा समावेश आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् मानदुखीपासून आराम मिळवा

बंदी घालण्यात आलेले हे सर्व 232 मोबाइल अ‍ॅप्स आयटी अ‍ॅक्ट कलम 69 चं उल्लंघन करत होते. या अ‍ॅप्सचा भारताच्या सुरक्षतेला सुद्धा धोका असल्याने भारत सरकारने अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा : ड्रॅगन फ्रूट खा अन् चमत्कार पहा

अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या की, लोन देणाऱ्या या अ‍ॅप्सकडून त्यांचे शोषण केले जात आहे. सामान्य नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचं काम केलं जात होतं. या चिनी अ‍ॅप्सवर कारवाई करण्यामागचं हे सुद्धा एक कारण आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी