PUBG: जिओ यूजर्सना मिळालं एक फ्री गिफ्ट!

टेक इट Easy
Updated Jul 10, 2019 | 20:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

PUBG: पबजी रॉयल बॅटल गेमचे लाईट व्हर्जन भारतात सध्या बीटामध्ये आहे. हा फ्री टू प्ले गेम आहे. जो लोअर एन्डच्या कॉम्प्युटरसाठी डिझाइन करण्यात आला आहे. जिओ युजर असाल तर, तुम्हाला काही युनिक गिफ्ट्सही मिळणार आहेत.

PUBG
पबजीचे ही लाईट व्हर्जन आता भारतात;  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • तुम्हाला माहितीय पबजी लाईट व्हर्जन भारतात लाँच झालंय?
  • जिओवर तुम्हाला मिळतील युनिक गिफ्टस्
  • चांगला डिजिटल एक्सपिरियन्स मिळण्याची आशा

नवी दिल्ली : प्लेयर अननोन बॅटलग्राउंड अर्थातच पबजीने नुकतीच भारतात आपली लाईट सर्व्हिसच्या पबजी लाईट बिटा व्हर्जनची घोषणा केली आहे. रॉयल बॅटल गेमचे हे व्हर्जन भारतात सध्या बीटामध्ये आहे. हा फ्री टू प्ले गेम आहे. जो लोअर एन्डच्या कॉम्प्युटरसाठी डिझाइन करण्यात आला आहे. पबजी लाईट ऑप्टिमाइज गेम प्ले आणि ग्राफिक मिळते, त्यामुळे युजरला चांगला अनुभव मिळतो. गेमच्या नव्या व्हर्जनच्या अनुभव आणखी चांगला करण्यासाठी पबजी लाईटने जिओशी करार केला आहे. ज्याद्वारे जीओ यूजर्स पबजी लाईटसाठी रजिस्टर करून एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड आणि वेगवेगळ्या फ्री स्क्रीन मिळवू शकतात. केवळ भारतासाठी झालेला हा एक्सक्लुझिव्ह करार दोन मोठ्या पॉप्युलर ब्रँड सोबत आला आहे. दोन्ही ब्रँडवर लोकांना एक चांगला डिजिटल एक्सपिरियन्स मिळणार आहे.

जाणून घेऊया जियो युजर्सना कशा पद्धतीने पबजी लाईट गेममध्ये रजिस्टर केल्यानंतर फ्री गिफ्ट मिळणार आहेत.

  1. पबजीलाईटवर युनिक एक्सपीरियन्सचा आनंद घेण्यासाठी जियो युजर्सला गळ्यात पहिल्यांदा https://gamesarena.jio.com या वेबसाईटवर जावे लागणार आहे. दोन स्टेपमध्ये होणारे सोपे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
  2. युजर्सना त्यांच्या रजिस्टर इमेल आयडीवर व्हेरिफिकेशन लिंक मिळेल
  3. एकदा व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर युजरला पुन्हा एक लिंक मिळणार आहे. त्यात युनिक रिडेम्पशन कोड मिळेल आणि त्याला गेमच्यामध्ये क्लेम करता येऊ शकते.
  4. पबजी लाईट डाऊनलोड केल्यानंतर आणि रजिस्टर केल्यानंतर युजर्सना मेन्यू स्टोअरमध्ये जावे लागणार आहे.
  5. मेन्यू ऑप्शनमध्ये अॅड बोनस/गिफ्ट कोडचा पर्याय मिळतो. त्यावर क्लिक करावे लागेल. इथे युजर्सला रिडेम्पशन कोड टाकावा लागणार आहे. त्यानंतर रिडिमवर क्लिक करायचे आहे.
  6. तेथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गिफ्ट्सचा अॅक्सेस मिळेल.

असे मिळवा बिटा व्हर्जन

या महिन्याच्या सुरुवातीला पबजीने आपल्या पबजी लाईटचे बीटा व्हर्जन भारतात लाँच केले आहे. हा गेम भारतात अजूनही बीटा फेजमध्येच आहे. हा गेम आता डाऊनलोड करता येऊ शकतो. तुम्हाला पबजीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथं पबजी लाईट लाँचर मिळेल. तिथून तुम्हाला ते डाऊनलोड करता येऊ शकते. इथं तुम्हाला गेमचे बिटा व्हर्जन मिळू शकते. ते इन्स्टॉल करण्यासाठी क्लिक करावे लागेल. लवकरच पबजी लाईट हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. पबजी लाईट गेम खेळण्यासाठी कमीत कमी २.४ गीगाहर्ट्सचा कोअर आयथ्री प्रोसेसर, चार जीबी रॅम आणि ४ जीबी स्टोअरेज असणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
PUBG: जिओ यूजर्सना मिळालं एक फ्री गिफ्ट! Description: PUBG: पबजी रॉयल बॅटल गेमचे लाईट व्हर्जन भारतात सध्या बीटामध्ये आहे. हा फ्री टू प्ले गेम आहे. जो लोअर एन्डच्या कॉम्प्युटरसाठी डिझाइन करण्यात आला आहे. जिओ युजर असाल तर, तुम्हाला काही युनिक गिफ्ट्सही मिळणार आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola