Reliance Jio Cheapest Plan : जिओचा स्वस्तात मस्त प्लॅन! यामध्ये १.५ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा

टेक इट Easy
Updated Jan 21, 2022 | 16:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Reliance Jio Prepaid plan | रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम योजना दिल्या आहेत. कंपनीचे ९९ रुपयांपासून ते ३४९९ रुपयांपर्यंतचे रिचार्ज प्लॅन आहेत. जिओचे काही रिचार्ज प्लॅन खूप खास आहेत कारण ते इतर प्लॅनच्या तुलनेत स्वस्त आहेत आणि अधिक फायदे देतात.

Reliance Jio Cheapest Plan in this with 1.5 gb data and unlimited calling free
जिओचा स्वस्तात मस्त प्लॅन!  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्संना नेटफ्लिक्स, डिस्नी प्लस हॉटस्टार आणि ॲमेझॉन प्राइम मोफत मिळत आहेत.
  • रिलायन्स जिओच्या २९६ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता ३० दिवसांची आहे.
  • कंपनीचे ९९ रुपयांपासून ते ३४९९ रुपयांपर्यंतचे रिचार्ज प्लॅन आहेत.

Reliance Jio Prepaid plan | नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम योजना दिल्या आहेत. कंपनीचे ९९ रुपयांपासून ते ३४९९ रुपयांपर्यंतचे रिचार्ज प्लॅन आहेत. जिओचे काही रिचार्ज प्लॅन खूप खास आहेत कारण ते इतर प्लॅनच्या तुलनेत स्वस्त आहेत आणि अधिक फायदे देतात. दरम्यान आता असाच आणखी एक रिलायन्स जिओचा (Reliance Jio) प्लॅन उपलब्ध झाला आहे. जिथे सर्व ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मचे फायदे कमी किमतीत उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये युजर्संना नेटफ्लिक्स (Netflix), डिस्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) आणि ॲमेझॉन प्राइम (Amazon Prime) मोफत मिळत आहेत. यासोबतच हे सर्व फायदेही मिळत आहेत. या प्लॅनची किंमत ३०० रूपयें पेक्षा कमी आहे.(Reliance Jio Cheapest Plan in this with 1.5 gb data and unlimited calling free).  

रिलायन्स जिओच्या २३९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये दररोज 1.5 जीबी (GB) डेटा दिला जातो. यामध्ये जिओ युजर्स एकूण ४२ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. लक्षणीय बाब म्हणजे डेलीचा डेटा संपल्यानंतर प्रत्येक जीबीला १० रुपये आकारले जातात. प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओ ॲप्स जिओ टीव्ही (Jio Apps JioTV), जिओ सिनेमा (Jio Cinema), जिओ सुरक्षा (JioSecurity) सारख्या ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

दरम्यान, रिलायन्स जिओच्या २९६ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता ३० दिवसांची आहे. यामध्ये जिओ युजर्स एकूण २५ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच एका दिवसात किंवा अगदी ३० दिवसात २५ जीबी पूर्ण करू शकतात. प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओ ॲप्स, जिओ सिनेमा, जिओ सुरक्षा यांसारख्या ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी