Jio चे शानदार रिचार्ज प्लान, 129 मध्ये मिळणार 'या' भरघोस सुविधा

टेक इट Easy
पूजा विचारे
Updated Feb 26, 2020 | 13:18 IST

जिओनं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिचार्ज ऑफर्सची एकामागोमाग एक रांग लावली आहे. जिओ आपल्या ग्राहकांना अजूनही नवनवीन ऑफर देत आहे.

jio
Jio चे शानदार रिचार्ज प्लान, 129 मध्ये मिळणार 'या' सुविधा  |  फोटो सौजन्य: BCCL

Jio Recharge Plan: जिओ (Jio) नं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिचार्ज ऑफर्सची एकामागोमाग एक रांग लावली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये जिओनं जसं आपल्या टॅरिफ प्लानच्या किंमती वाढवल्या, त्यानंतर अन्य कंपन्यांनी सुद्धा आपल्या टॅरिफमध्ये वाढ केली. मात्र जिओ आपल्या ग्राहकांना अजूनही नवनवीन ऑफर देत आहे. या ऑफर्समध्ये तुम्हाला एका महिन्यांपासून एक वर्षांपर्यंतच्या ऑफर्सचा समावेश आहे. 

जिओनं आपल्या ग्राहकांसाठी एक स्वस्त रिचार्ज प्लान सादर केला. हा रिचार्ज प्लान केवळ 129 रूपयांचा आहे. ज्यात तुम्हाला जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. त्यासोबत अन्य नेटवर्कवर बोलण्यासाठी 1000 मिनिटं मिळतील. इतकंच नाही तर या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना 300 SMS आणि 2GB 4G डेटाची सुविधा मिळेल. या प्लानची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. तर जिओ अॅप्सचं सुद्धा फ्री सब्सक्रिप्शन तुम्हाला दिलं जाईल. 

याव्यतिरिक्त जिओनं आपल्या ग्राहकांसाठी 149 रूपयांचा प्लान सुद्धा सादर केला आहे. ज्यात यूजर्संना जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंगसोबत 24GB 4G डेटा आणि 2400 SMS मिळतील. त्यासोबत अन्य नेटवर्कवर बोलण्यासाठी 300 मिनिटं मिळणार आहेत. या प्लानची व्हॅलिडिटी 24 दिवसांसाठी आहे. तुम्हाला जिओचा हा प्लान अफॉर्डेबल पॅकमध्ये मिळेल. 

याव्यतिरिक्त तुम्हाला दीर्घकालीन रिचार्जचा प्लान हवा असल्यास तुम्ही 1299 रूपयांचा प्लान असलेला रिचार्ज करू शकता. रिलायन्स जिओनं  1299 रुपयांच्या प्लॅनमध्ये काही बदल केला आहे. त्याच बरोबर 2020 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील काही बदल केलेत. यासोबतच व्हॅलिडिटी देखील कमी केली आहे. ग्राहकांना  या प्लानमध्ये 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. याआधी या प्लानमध्ये 362 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येत होती. मात्र जिओनं हा प्लान अपडेट करून याची व्हॅलिडिटी कमी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी