कोरोना लसीसाठी  Reliance Jio करणार तुमची मदत, सुरू केली खास सर्व्हिस

टेक इट Easy
Updated Jun 10, 2021 | 15:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Reliance Jio ने आपल्या युजर्सच्या गरजा लक्षात घेता एक खास सर्व्हिस सुरू केली आहे. या सर्व्हिसच्या मदतीने युजर कोरोना लसीची उपलब्धता जाणून घेऊ शकतात.

reliance jio
कोरोना लसीसाठी Reliance Jio करणार मदत, सुरू केली सर्व्हिस 

थोडं पण कामाचं

  • टेलिकॉम कंपनी  Reliance Jioने खास सर्व्हिस सुरू केली आहे.
  • जिओने खास सर्व्हिस व्हॉट्सअॅप चॅटबोटच्या माध्यमातून सुरू केली आहे. 
  • यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईल फोनमध्ये  7000770007 हा नंबर सेव्ह करावा लागेल.

मुंबई: COVID 19पासून बचावासाठी कोरोनाची लस(corona vaccine) घेणे किती गरजेचे आहे हे आपण सगळेच जाणतो. आता टेलिकॉम कंपनी  Reliance Jioने खास सर्व्हिस सुरू केली आहे. याच्या माध्यमातून युजर व्हॉट्सअॅप(whatsapp) फोनवरील रिचार्ज करण्याशिवाय कोरोना लसीच्या(corona vaccine) उपलब्धतेबाबत माहिती मिळवू शकतात. जिओने खास सर्व्हिस व्हॉट्सअॅप चॅटबोटच्या माध्यमातून सुरू केली आहे. reliance jio start service for corona vaccine

Reliance Jio च्या या खास सर्व्हिसमुळे लोकांना आता सेशनला रिफ्रेश करण्यासाठी वन टाईम पासवर्डची झंझट राहणार नाही. आता कोणत्याही झंझटशिवाय COVID-19 vaccine availability ची माहिती मिळवू शकता. 

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार  Jio Chatbot च्या मदतीने आता जिओ युजर रिचार्ज, पेमेंट, प्रश्नांची उत्तरे तसेच तक्रार दाखल करू शकतात. आता कोविड १९च्या लसीची माहितीही मिळवू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईल फोनमध्ये  7000770007 हा नंबर सेव्ह करावा लागेल. यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करून तुम्हाला या चॅटवर Hi असे लिहून पाठवावे लागेल. 

विशेष म्हणजे हा चॅटबोट इतर नेटवर्कच्या युजर्ससाठीही काम करतो. म्हणजेच इतर युजर्सही लसीबाबत संबंधित माहिती मिळवू शकतात. अनरजिस्टर्ड नंबर अथवा नॉन जिओ नेटवर्ककडून माहितीचे आवेदन आल्यास जिओ चॅटबोट पहिल्या युजरचे व्हेरिफिकेशन करणार. 

कानपूरमध्ये दोन वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी

भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनची चाचणी मुलांवर सुरू करण्यात आली आहे. कानपूरच्या प्रखर हॉस्पिटलमध्ये गेल्या मंगळवारपासून ही चाचणी करण्यात आली होती. लसीच्या चाचणीदरम्यान मुलांना तीन गटात विभागण्यात आले. पहिल्या गटात दोन ते सहा वर्षीय मुले, दुसऱ्या गटात ६ ते १२ वर्षीय आणि तिसऱ्या गटात १२ ते १८ वर्षाच्या मुलांना ठेवण्यात आले. आतापर्यंत जगात कोठेच इतक्या लहान मुलांवर ही चाचणी करण्यात आलेली नाही. मुलांना तीन गटात विभागून लसीची चाचणी कानपूरममध्ये(kanpur) केली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी