जगातील 'सर्वात श्रीमंत व्यक्तीने' अवघ्या एका दिवसात गमावले तब्बल ४९६ हजार कोटी रुपये! 

टेक इट Easy
Updated Oct 27, 2019 | 13:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jeff Bezos amazon: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांना अवघ्या एक दिवसात हजारो कोटींचा फटका बसला आहे.

richest person of the world and amazon ceo jeff bezos lost 496 thousand crores in one day
जगातील 'सर्वात श्रीमंत व्यक्तीने' अवघ्या एका दिवसात गमावले तब्बल ४९६ हजार कोटी रुपये!   |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • अमेझॉनच्या सीईओला सर्वात मोठा धक्का
  • एका दिवसात जेफ बेजोस यांना हजारो कोटींचं नुकसान
  • अमेझॉनचे शेअर घसरल्याने जेफ बेजोसच्या संपत्तीतही घट

वॉश्गिंटन: जगातील 'सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस याच्यासंबंधी एक बातमी नुकतीच समोर आली आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी अमेझॉनने आल्या तिसऱ्या त्रैमासिकाबाबतची महिती दिली आहे. ज्यानुसार जेफ बेजोस यांना मोठा धक्का बसला आहे. पण लेटेस्ट रँकिंगमध्ये अद्यापही त्यांचं नाव सर्वात वर आहे. सध्या जेफ बेजोस हा १११ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. 

(जेफ बेजोस)

दरम्यान, फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की, २४ ऑक्टोबरला सुरुवातीच्या तासाभरातच अमेझॉनटे शेअर हे तब्बल ७ टक्क्यांनी घसरले आहेत. ज्यामुळे बेजोसची संपत्ती ही १०३.९ अब्ज डॉलर झाली आहे. म्हणजेच एक दिवसात त्यांच्या संपत्तीत ७ अब्ज डॉलर (जवळजवळ ४९६.६३ हजार कोटी रुपये) ची घट झाली. यासोबतच ते मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगात बराच काळ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल राहणारे बिल गेट्स हे पुन्हा एकदा अव्वल स्थानी आले होते. 

मात्र, त्याच दिवसात बिल गेट्स आणि जेफ बेजोस या दोघांच्याही संपत्तीत वाढ झाली. बिल गेट्सची संपत्ती १०७ अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे. तर जेफ बेजोसची संपत्ती १११ अब्ज डॉलर झाली. त्यामुळे पुन्हा जेफ बेजोस पहिल्या स्थानावर पोहचले आहेत. सीएनबीसी रिपोर्टनुसार बेजोसजवळ अमेझॉनचे  ५७,६१०,३५९ शेअर आहेत. तर गुरुवारी बाजार बंद होईपर्यंत अमेझॉनच्या शेअरमध्ये ६.६ टक्के घट होती. जेफ बेजोस २०१८ सालापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. वार्षिक तारखेची तुलना केल्यास त्यांच्या संपत्तीत १३.९ अब्ज डॉलरची घट आहे. 

याआधी जेफ बेजोस यांना त्यांच्या संपत्तीबाबत असा झटका तेव्हा लागला होता जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर त्यांना अमेझॉनचे काही शेअर हे आपल्या पत्नीला द्यावे लागले होते. जेफ बेजोस यांनी आपले एक चतुर्थांश शेअर (अमेझॉन शेअर) आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केले आहेत. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, जेफ बेजोस यांच्या घटस्फोटाची रक्कम ही आजपर्यंतची सर्वात मोठी डिव्होर्स सेटलमेंट रक्कम आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी