royal enfield: रॉयल एन्फिल्डमध्ये होणार मोठा बदल; अनेकांच्या आवाक्यात येण्याची शक्यता

टेक इट Easy
Updated Jul 02, 2019 | 17:52 IST | टाइम्स नाऊ हिंदी

royal enfield: जगभरातील तरुणांमध्ये पॉप्युलर असलेल्या आयशर मोटर्सनेही मंदीची दखल घेतली असून, बाजारपेठ काबीज करण्यासाठी नवीन योजना आखली आहे. रॉयल एन्फील्डचे एक २५० सीसीचे मॉडेल लाँच करण्याचा कंपनीचा मानस आहे.

royal enfield
रॉयल एन्फिल्ड आता आवाक्यात येणार?  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : जगभरात ऑटो मोबाईल क्षेत्रात मोठी मंदी अनुभवायला मिळत आहे. वाहनांचा खप कमी झाला आहे. त्यामुळं ऑटो मोबाईल कंपन्यांना नव नवीन क्लुप्त्या लढवाव्या लागत आहेत. जगभरातील तरुणांमध्ये पॉप्युलर असलेल्या आयशर मोटर्सनेही या मंदीची दखल घेतली असून, बाजारपेठ काबीज करण्यासाठी नवीन योजना आखली आहे. रॉयल एन्फील्डचे एक २५० सीसीचे मॉडेल लाँच करण्याचा कंपनीचा मानस आहे. आपला मार्केट शेअर कायम ठेवण्यासाठी किंबहुना तो वाढवण्यासाठी कंपनीची धडपड सुरू आहे. नव्या २५० सीसी मॉडेलच्या माध्यमातून कंपनील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकेल, अशी कंपनीला आशा आहे. गेल्या काही महिन्यांपासून रॉयल एन्फिल्डच्या बाइक्सच्या किमती आठ ते दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळं गाड्यांचा खप घसरला आहे. त्याची गंभर दखल आयशर मोटर्सने घेतली असून, आता नव्या बाईकसह मार्केटमध्ये दमदार पुनरागम करण्याचा प्रयत्न आहे.

बाईकमध्ये होणार बदल                    

बीएस6 नॉर्म्स, एबीएस आणि इंश्यूरन्सच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचा परिणाम बाइक्सच्या किमतींवर झाला आहे. सध्या भारतात अर्थव्यवस्थेला अपेक्षित गती नाही. जगभरातील इतर अर्थव्यवस्थांची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. त्यामुळं एकूण ऑटो मोबाईल सेक्टरला मंदीचा सामना करावा लागत आहे. रॉयल एन्फिल्डच्या गाड्यांची किंमत १ ते दीड लाख रुपये आहे. ही किंमतच कंपनीसाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या पाच वर्षांत कायम दहा टक्क्यांच्यावर वाढ होणारी रॉयल एन्फिल्ड सध्या दहा टक्क्यांच्या वर घसरत चालली आहे. याची गंभीर दखल कंपनीने घेतली आहे. कंपनीचे नवीन सीईओ विनोद दसारी यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने ३५० सीसीच्या बाईकमध्ये बदल करण्याचा विचार सुरू केला आहे. या संदर्भात इकॉनॉमिक टाईम्सने सविस्तर वृत्त दिले असून, त्यानुसार कंपनीची इंडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम २५० सीसीच्या नव्या बाईकवर काम करत आहे.  

‘हवी तशी मॉडिफाय करा’

दरम्यान, कंपनी आता ग्राहकांना इतर सुविधा देण्यासाठी पुढे आली आहे. भारतात रॉयल एन्फिल्ड खरेदी करून ती आपल्याला हवी तशी मॉडिफाय करून घेण्याचा एक ट्रेंड आहे. त्याची दखल कंपनीने घेतली आहे. त्यानुसार आता एखाद्याला गाडी मॉडिफाय करायची असेल तर, ती कंपनीच्या शो रूममध्येच मॉडिफाय करून मिळणार आहे. दसारी यांच्या म्हणण्यानुसार रॉयल एन्फिल्डप्रमाणे प्रिमियम सेगमेंटमध्ये अनेक अशा बाईक्स आहेत ज्या ग्राहकांना आवडू शकतात. त्यामुळं कंपनी सातत्याने आपल्यामध्ये बदल करून घेत आहे. कंपनी सध्या रॉयल एन्फिल्डचे नो फ्रिल्स वर्जनही लाँच करण्याची तयारी करत आहे. जर, एखाद्याला गाडी मॉडिफाय करायचीच आहे. तर तो ग्राहक नो फ्रिल्स वर्जन खरेदी करू शकणार आहे. त्यानंतर तो आपल्या मर्जीनुसार अॅक्सेसरीज लावू शकतो. रॉयल एन्फिल्डची विक्री घटली असली तरी त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. सध्या बाईकची किंमत आणि फीचर्स अजूनही विक्रीमध्ये अडथळा ठरत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
royal enfield: रॉयल एन्फिल्डमध्ये होणार मोठा बदल; अनेकांच्या आवाक्यात येण्याची शक्यता Description: royal enfield: जगभरातील तरुणांमध्ये पॉप्युलर असलेल्या आयशर मोटर्सनेही मंदीची दखल घेतली असून, बाजारपेठ काबीज करण्यासाठी नवीन योजना आखली आहे. रॉयल एन्फील्डचे एक २५० सीसीचे मॉडेल लाँच करण्याचा कंपनीचा मानस आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola