Samsung Galaxy Band: दोन फिटनेस बॅंडसह सॅमसंगचं नवं घड्याळ लॉन्च 

टेक इट Easy
Updated Jun 25, 2019 | 22:02 IST

Samsung Galaxy Watch: सॅमसंगनं गॅलेक्सी वॉच एक्टिव्ह आणि फिटनेस बँज गॅलेक्सी फिट आणि गॅलेक्सी फिट ई लॉन्च केलं आहे. जाणून या नव्या प्रोडक्टची किंमत आणि फिचर.

Samsung Galaxy Band
Samsung Galaxy: दोन फिटनेस बॅंडसह सॅमसंगचं नवं घड्याळ लॉन्च 

मुंबईः सॅमसंगनं नवीन दोन प्रोडक्ट भारतात लॉन्च केले आहेत. हे दोन्ही प्रोडक्ट्स वियरेबल आणि स्मार्ट फिटनेस कॅटेगरीचा भाग आहेत. कंपनीनं दावा केला आहे की, हे प्रोडक्ट यूजर्सची प्रत्येक एक्टिव्हिटी ट्रॅक करतं आणि त्यांना संपूर्ण वैयक्तिक आरोग्य सेवा देते. सॅमसंग गॅलेक्सी फिट आणि गॅलेक्सी फिट ई हे दोन फिटनेस बॅंड आणि एक स्मार्ट वॉच गॅलेक्सी वॉच एक्टिव्ह लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी वॉच एक्टिव्हमध्ये हेल्थसोबतच तुम्हाला डिझाइन देखील मिळणार आहे. म्हणजेच या वॉचमध्ये तुम्हाला एक वॉच आणि एक फिटनेस बॅंड दोन्ही बघायला मिळेल. 

गॅलेक्सी वॉच एक्टिव्ह, गॅलेक्सी फिट आणि गॅलेक्सी फिट ई चे फिचर 

गॅलेक्सी वॉच एक्टिव्ह तुमचं दैनंदिन आयुष्य ट्रॅक करते. यात तुम्हाला एक्सरसाइज, झोप, स्ट्रेस आणि हेल्थ ट्रॅकिंग हे फिचर देखील मिळतील. जे गॅलेक्सी वॉच एक्टिव्ह एक पर्सनल कोचच्या रूपात सादर करतं. तुम्ही तुमच्या ड्रेससोबत मॅच करण्यासाठी वॉचचं फेस आणि स्ट्रेप दोन्ही बदलू शकता. 

गॅलेक्सी वॉच एक्टिव्ह अॅन्ड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसोबत चांगल्या पद्धतीनं काम करतं. याव्यतिरिक्त सॅमसंगनं दोन स्मार्ट बॅंड देखील लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी फिट ट्रॅकच्या बाबतीत ०.९५ इंचाचा फुल कलर एमोलेड डिस्प्ले मिळतो. हा बॅंड तुम्हांला एक्टिव्हिटी डेटा ट्रॅक करण्याची सुविधा देखील देतो. या फिटनेस बॅंडच्या मदतीनं तुम्ही वॉकिंग, रनिंग आणि बाइकिंगपर्यंत ट्रॅक करू शकता. 

सॅमसंग गॅलेक्सी फिट ऑटो वर्कआऊट ट्रॅकिंग फिचरसह मिळणार आहे. जे ६ एक्टिव्हिटी ट्रॅक करतं. सॅमसंग हेल्थ अॅपच्या मदतीनं तुम्ही हा बॅंड कस्टमाइज करू शकता. या प्रकारे गॅलेक्सी फिट ई मध्ये तुम्हांला ०.७४ इंचाचा मोनो पोलेड डिस्प्ले मिळेल. हे डिव्हाईस फ्री आरटी ओएसवर काम करतो. गॅलेक्सी फिटमध्ये तुम्हांला २ एमबीची रॅम आणि ३२ एमबीचा रोम मिळेल. गॅलेक्सी ई मध्ये १२८ केबीची रॅम मिळेल. 

गॅलेक्सी वॉच एक्टिव्ह, गॅलेक्सी फिट आणि गॅलेक्सी फिट ई ची किंमत 

गॅलेक्सी वॉच एक्टिव्ह तुम्ही १९,९९० रूपयांच्या किंमतीला खरेदी करू शकता. वॉच एक्टिव्ह तुम्हांला ब्लॅक, सिल्वर, रोज गोल्ड आणि डीप ग्रीन या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. गॅलेक्सी फिटमध्ये तुम्हांला ९,९९० रूपयांचा खर्च करावा लागेल. गॅलेक्सी फिट ई ची किंमत २,५९० रूपये आहे. गॅलेक्सी फिट ब्लॅक आणि सिल्वर दोन रंगात उपलब्ध असेल. गॅलेक्सी फिट ई ब्लॅक, व्हाईट आणि यलो या तीन रंगात उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Samsung Galaxy Band: दोन फिटनेस बॅंडसह सॅमसंगचं नवं घड्याळ लॉन्च  Description: Samsung Galaxy Watch: सॅमसंगनं गॅलेक्सी वॉच एक्टिव्ह आणि फिटनेस बँज गॅलेक्सी फिट आणि गॅलेक्सी फिट ई लॉन्च केलं आहे. जाणून या नव्या प्रोडक्टची किंमत आणि फिचर.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola