Smart TV: तुमच्या स्मार्ट टीव्हीची काळजी कशी घ्याल?

टेक इट Easy
Updated Jun 29, 2019 | 00:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Smart TV: तुमचा कॉम्प्युटर नीट चालावा यासाठी व्हायरस स्कॅन करणं गरजेचं आहे. तसचं स्मार्ट टीव्हीसाठीही गरजेचं आहे. तुम्ही टीव्ही वायफायशी कनेक्ट करत असाल तर, तुम्हाला व्हायरस येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

Smart TV file photo
तुमच्या स्मार्ट टीव्हीची काळजी घ्या   |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : तंत्रज्ञान अतिशय वेगानं बदलत आहे. स्मार्टफोननं माणसाचं आयुष्यच बदलून टाकलं आहे. आता स्मार्ट फोनच्या मदतीनं टीव्ही देखील इंटरनेटला जोडला जाऊ शकतो. पण, इंटरनेट जितकं चांगलं तितकं ते वाईटही ठरू शकतं. इंटरनेटशी जोडल्यामुळं जसा तुमच्या कॉम्प्युटरला किंवा मोबाईलला व्हायरस येऊ शकतो. तसा तो तुमच्या टीव्हीलाही येऊ शकतो. त्यामुळं स्मार्ट टीव्हीचा वापर करताना काळजी घेणंही तितकचं महत्त्वाचं आहे. सॅमसंग यूएस सपोर्ट अकाऊंटने एक ट्वीट करून ग्राहकांना त्यांचा टीव्ही अधून-मधून स्कॅन करण्याचा सल्ला दिला आहे. युजरने आपला टीव्ही काही ठराविक काळानंतर स्कॅन करून घेणं गरजेचं आहे. ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तुमचा कॉम्प्युटर नीट चालावा यासाठी व्हायरस स्कॅन करणं गरजेचं आहे. तसचं ते स्मार्ट टीव्हीसाठीही गरजेचं आहे. जर तुम्ही तुमचा टीव्ही वायफायशी कनेक्ट करत असाल तर, तुम्हाला टीव्हीमध्ये व्हायरस येणार नाही याची काळजी घेणंही गरजेचं आहे. तेव्हा एक नजर टाकुया तुमचा स्मार्ट टीव्ही स्मार्ट कसा ठेवावा यावर,

सॅमसंग स्मार्ट टीव्हीसाठी आवश्यक गोष्टी

  1. सॅमसंग स्मार्ट टीव्ही ऑन करा आणि सेटिंगमध्ये जा
  2. जनरल सेटिंग सेक्शनमध्ये जा आणि सिस्टम मॅनेजरमध्ये हा पर्याय निवडा
  3. आता स्मार्ट सिक्युरिटी हा पर्याय निवडा आणि स्कॅन बटनावर टॅप करा
  4. यानंतर टीव्ही स्कॅन करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि स्कॅन करून झाल्यावर ती थांबेल

ही काळजी घ्या

  1. व्हायरसचे मुख्य कारण ब्राऊझर आणि डाऊनलोड हे असते.
  2. दुसरे प्रमुख कारण म्हणजे स्कॅन न करता पेन ड्राईव्हचा वापर करणं

अन्य अँड्रॉईड सिस्टमवर चालणारे स्मार्ट टीव्ही

साधारणपणे स्मार्ट टीव्ही गुगलच्या अँड्रॉईड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. सध्या तरी कोणत्याही अॅपला स्मार्ट टीव्हीवर काम करता यावे, असे डिझाईन करण्यात आलेले नाही. त्यामुळं युजरला कोणत्याही अँटीव्हायरस अॅपची एपीके फाईल डाऊनलोड करून इन्स्टॉल करता येणार नाही. त्यामुळं एखादं विश्वासार्ह अँटीव्हायरस अॅप डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर ते थंप ड्राईव्हच्या साह्याने टीव्हीमध्ये ट्रान्सफर करा आणि इन्स्टॉल करा. त्यानंतर ते रन करा आणि टीव्ही स्कॅन करून घ्या. तुम्हाला तुमच्या टीव्हीची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. त्यामुळं स्मार्ट टीव्ही वापरताना त्याची काळजी कशी घ्यावी, याची माहिती करून घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Smart TV: तुमच्या स्मार्ट टीव्हीची काळजी कशी घ्याल? Description: Smart TV: तुमचा कॉम्प्युटर नीट चालावा यासाठी व्हायरस स्कॅन करणं गरजेचं आहे. तसचं स्मार्ट टीव्हीसाठीही गरजेचं आहे. तुम्ही टीव्ही वायफायशी कनेक्ट करत असाल तर, तुम्हाला व्हायरस येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola