स्मार्टफोन युजर्सला व्हायरसचा धोका, CBI चा सर्व राज्यांना अलर्ट

स्मार्टफोन युजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. देशभरातली स्मार्टफोन युजर्सने अलर्ट राहण्याची आवश्यकता असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...

smartphone users beware of cerberus trojan malware cbi alerts all state government india technology news
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • स्मार्टफोन युजर्सला व्हायरसचा धोका
  • सीबीआयने देशातील सर्व राज्यांना केलं अलर्ट
  • राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, पोलीस, सुरक्षा यंत्रणांना अलर्ट

नवी दिल्ली: केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय (CBI) ने सेरबेरस ड्रोजन एक मालवेअर व्हायरस बाबत इशारा देत देशातील सर्व राज्यांना अलर्ट केलं आहे. सीबीआयने देशातील सर्व राज्यांच्या पोलीस दलाला या व्हायरस विषयी माहिती देत सतर्क केलं आहे. या व्हायरसच्या माध्यमातून तुमचा वैयक्तिक डेटा चोरी केला जात आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे सर्व नागरिक आपल्या घरातच आहेत. त्यामुळे नागरिक मोबाइल फोनचा अधिक वापर करतात आणि याचाच फायदा घेत हॅकर्स तुमचा मोबाइल डेटा चोरी करु शकतात.

नेमकं काय होतं?

सरबेरस व्हायरसच्या माध्यमातून स्मार्टफोन युजर्सला कोविड-१९ संबंधित माहिती देण्यासाठी एखादा मेसेज पाठवण्यात येतो. कोरोना व्हायरस संदर्भात माहिती मिळवण्यासाठी नागरिक या लिंकवर क्लिक करतात. या लिंकवर क्लिक करताच व्हायरस मोबाइलमध्ये शिरकाव करतो आणि त्यानंतर युजर्सचा डेटा चोरी होतो. 

सायबर गुन्हेगार करतात याचा वापर 

सीबीआयचे प्रवक्ता आरके गौड यांच्या मते, इंटरपोलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अलर्ट देण्यात आला आहे. हा अलर्ट बँकिंग ट्रोजनशी संबंधित सरबेरस म्हणून ओळखला जातो. या व्हायरसचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हेगार वापरतात. सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा फायदा घेत गुन्हेगार नागरिकांना एसएमएस किंवा ईमेलच्या माध्यमातून कोरोनाच्या नावाने एखादी लिंक पाठवतात. त्यानंतर जो कोणी व्यक्ती त्या लिंकवर क्लिक करतो त्याच्या मोबाइल, कम्प्यूटर किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरस प्रवेश करतो. व्हायरसने डीव्हाईसमध्ये प्रवेश करताच त्याचा डेटा गुन्हेगारांपर्यंत पोहोचतो. 

आर्थिक व्यवहारांच्या संदर्भातील डेटा चोरी 

पीटीआय वृत्तसंस्थेच्या मते, ट्रोजन हा एख सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो दिसण्यास तर व्यवस्थित दिसतो. मात्र, हा मोबाइल, लॅपटॉपमध्ये सुरू होताच त्याचे नकारात्मक परिणाम सुरू होतात आणि हॅकर्स सर्व डेटा चोरी करु शकतात. अधिकाऱ्यांच्या मते, सीबीआयने जागतिक माहिती मिळाल्यावर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलाला तसेच सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क करण्यासाठी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकिंग ट्रोजन हा प्रामुख्याने क्रेडिट कार्ड नंबर सारखी आर्थिक माहिती चोरी करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी