Central Governmnet: चांगली बातमी! शेतकऱ्यांसाठी सरकारने केली खास योजना; तुमचे उत्पन्नही दुप्पट होणार, जाणून घ्या कसे?

टेक इट Easy
Updated Jan 09, 2022 | 19:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Farmers Income in India | केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही खास योजनांची घोषणा केली आहे. जेणेकरून ते त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारही अनेक विशेष पावले उचलत आहे. दरम्यान राज्य आणि केंद्र सरकार मिळून २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

Special schemes for farmers by the government Your income will also double find out how
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली खास योजना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारही अनेक विशेष पावले उचलत आहे.
  • राज्य आणि केंद्र सरकार मिळून २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.
  • सरकार पीएम किसान सारख्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे. केंद्र सरकार २०२७-२८ पर्यंत १०००० शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) स्थापन करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देत आहे ज्याचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च ६८६५ कोटी रुपये आहे आणि गोव्यात ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. असे कृषीमंत्री तोमर यांनी म्हटले.

Farmers Income in India | नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांसाठी काही खास योजनांची घोषणा केली आहे. जेणेकरून ते त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारही अनेक विशेष पावले उचलत आहे. दरम्यान राज्य आणि केंद्र सरकार मिळून २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान योजना, किसान मानधन योजना, ट्रॅक्टर योजना यांसह अनेक विशेष योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आल्या आहेत. जेणेकरून त्यांना आर्थिक आणि साधन सुविधा मिळू शकतील. गोव्यातील एका कार्यक्रमाला संबोधित करताना कृषी मंत्री तोमर म्हणाले की, देशाच्या संपूर्ण देशांतर्गत उत्पादनात (GDP) कृषी क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे, त्यामुळे कृषी क्षेत्राला बळकटी देणे अधिक महत्त्वाचे आहे. (Special schemes for farmers by the government Your income will also double find out how). 

दरम्यान, सरकार पीएम किसान सारख्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे. केंद्र सरकार २०२७-२८ पर्यंत १०००० शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) स्थापन करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देत आहे ज्याचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च ६८६५ कोटी रुपये आहे आणि गोव्यात ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. असे कृषीमंत्री तोमर यांनी आणखी म्हटले. 

याशिवाय सरकारने पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला ((Farmers producers Organisation) १५ लाख रुपये दिले जाणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांना सरकारकडून कृषी उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जात आहे. यासाठी सरकार ११ शेतकऱ्यांची एक संघटना स्थापन करणार असून, ही योजना सर्व देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी