उन्हाळ्यात कूलिंगसाठी ट्राय करा हे Summer Hack, पंखा-कुलर देतील AC सारखी थंड हवा

टेक इट Easy
Updated Apr 14, 2023 | 16:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Summer Cooling Tips: तुमचा पंखा किंवा कुलरसुद्धा या कडक उन्हापासून तुमचे संरक्षण करू शकत नसेल, तर तुम्ही घरच्या घरी एसी सारख्या हवेसाठी एक अप्रतिम जुगाड करू शकता. यामुळे तुमचा पंखा किंवा कुलर पुन्हा थंड हवा देवू लागेल.

Summer Hack for cooling in summer fan-cooler will provide cool air like an AC
उन्हाळ्यात कूलिंगसाठी ट्राय करा हे Summer Hack  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कडक उन्हात थोडीशी थंड हवा मिळाली तर जीव सुखावतो.
  • उन्हाळ्यात हे हॅक तुमच्यासाठी खूप उपयोगी पडू शकते.
  • उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यास मदत होईल

Summer AC Tips: उन्हाळा सुरू झाला आहे. या कडक उन्हात थोडीशी थंड हवा मिळाली तर जीव सुखावतो. मात्र, जेव्हा तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी नवीन कूलर किंवा हाय-स्पीड फॅन आणता, तेव्हा काही काळानंतर त्याचा प्रभाव आपोआप कमी होऊ लागतो. तुमचा पंखा किंवा कुलरसुद्धा या कडक उन्हापासून तुमचे संरक्षण करू शकत नसेल, तर तुम्ही घरच्या घरी एसी सारख्या हवेसाठी एक अप्रतिम जुगाड करू शकता. यामुळे तुमचा पंखा किंवा कुलर पुन्हा थंड हवा देवू लागेल. (Summer Hack for cooling in summer fan-cooler will provide cool air like an AC)

तुम्हीही उन्हाळ्यात एसीशिवाय राहू शकत नसाल तर या उन्हाळ्यात हे हॅक तुमच्यासाठी खूप उपयोगी पडू शकते. यामुळे तुम्हाला एसी लावण्याचीही गरज भासणार नाही आणि तुम्ही कमी खर्चात उन्हाळ्यात हिवाळ्याचा आनंद घेऊ शकाल. यासोबतच आणखी खास गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या फॅन किंवा कूलरमध्ये एखादे छोटे मशीन बसवून आणि छोटे बदल करून कूलर/ फॅनला एसी बनवू शकता. फॅन किंवा कूलरचा वेग वाढवण्यासाठी येथे एक DIY हॅक देण्यात आले आहे, जे योग्यरित्या फॉलो केल्यावर तुम्हाला तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यास मदत होईल.

अधिक वाचा:  Portable AC | उकाड्याने बेहाल झाले आहात...मग हा झकास पोर्टेबल एसी तुमच्या इच्छेप्रमाणे फिरवा घरभर...व्हा एकदम कूल

जर तुमचा कूलर कमी हवा देत असेल तर त्याचे कंडेन्सर खराब झाल्यामुळे असे होऊ शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या कूलरमध्ये बसवलेले कंडेन्सर बदलता, तेव्हा तुमचा कूलर आपोआप एसीप्रमाणे काम करायला लागतो. तुम्ही घरच्या घरी कूलर किंवा फॅनचे कंडेन्सर सहजपणे बसवू किंवा ठीक करू शकता. तुम्ही कंडेन्सर ऑनलाइनही ऑर्डर करू शकता.

धूळ जमा होऊ देऊ नका

कूलरच्या पंख्यामध्ये धूळ आणि घाण साचल्यामुळे गरम किंवा कमी हवा येऊ लागते. म्हणूनच पंखा आणि कंडेन्सर वेळोवेळी स्वच्छ करणे खूप आवश्यक आहे.

कुलर योग्य ठिकाणी ठेवा

कूलरमधून एसीसारखी हवा येण्यासाठी कूलर योग्य ठिकाणी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कूलर पाण्याच्या साहाय्याने थंड हवा बाहेर फेकतो, त्यामुळे जर कूलरचा वापर करून खोली खूप थंड होत असेल, तर तो खिडकीसमोर ठेवावा किंवा काही प्रकारचे वेंटिलेशन ठेवावे. यामुळे गरम हवा बाहेर पडू शकेल आणि थंड हवा तुमच्या रूममध्ये फिरू शकेल.

अधिक वाचा: Night Sweating: रात्री झोपताना घाम येतोय ? हे असू शकते गंभीर आजारांचे लक्षण

कूलरमध्ये बर्फ ठेवा

जर तुम्हाला कूलरची खूप थंड हवा घ्यायची असेल तर पाण्यासोबत कूलरमध्ये बर्फाचे तुकडेही टाकू शकता. यामुळे कूलरच्या ताट्या किंवा जाळी अधिक थंड होईल आणि तुम्ही दिवसभर थंड हवेचा आनंद घेऊ शकाल.

पंख्याची गती वाढवा

पंख्याचा वेग वाढवणे उन्हाळ्यात प्रभावी ठरू शकते, तुम्ही पंख्याच्या ब्लेडचा पुढचा भाग ओल्या कापडाने स्वच्छ करून पंख्याचा वेग वाढवू शकता. पंख्याचे पत्ते खूप हळू आणि हलक्या हाताने स्वच्छ करावे लागेल अन्यथा त्याचा शेप बिघडला तर हवा कमी येईल.

कूल डाउन फॅन मोटर

पंख्याची मोटार जास्त वेळ चालल्याने गरम झाल्यावर पंखा गरम हवा देतो. त्यामुळे जर तुम्हाला एसीसारखी थंड हवा घ्यायची असेल, तर पंखा संतुलित पद्धतीने चालवा. गरज नसताना पंखा बंद करा, जेणेकरून पंख्याची मोटर पुन्हा थंड होईल आणि ती परत चालू केल्यावर तुम्हाला थंड हवा मिळेल.

अधिक वाचा: CRS Mark on Mobile : तुमचा मोबाईल बनावटी तर नाही ना? CRS चिन्ह सांगेल वास्तव

टेबल फॅन एसी बनवण्याची सोपी पद्धत

जर तुम्हाला घरच्या टेबल फॅनमधून एसीसारखी हवा हवी असेल तर ही साधी DIY ट्रिक तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. ज्याच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्याच्या तणावातून सुटका करून घेऊ शकता आणि थंड हवेत दिवस-रात्र घालवू शकता. एक डिस्पोजेबल बाटली घ्या आणि त्यात 3 चमचे मीठ टाका आणि नंतर बाटलीचे झाकण लावून बाटली चांगली हलवा. यानंतर, सर्व बाटल्या फ्रीजमध्ये ठेवा. आता तुमच्या गोठवलेल्या बाटल्या टेबल फॅनपासून 6 इंच अंतरावर ठेवा. अशा प्रकारे पंख्याची हवा जेव्हा गोठलेल्या बाटल्यांवर पडेल तेव्हा तुम्हाला खूप थंड हवा जाणवेल.
आणि तोच तुमचा देसी जुगाड वाला एसी तयार होईल. ही प्रक्रिया टेबल फॅन किंवा बॉक्स फॅनवर उत्तम प्रकारे काम करते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी