Vodafone Idea कडून ग्राहकांना होळीचं गिफ्ट, रिचार्ज पॅकवर मिळणार हा फायदा 

टेक इट Easy
पूजा विचारे
Updated Mar 03, 2020 | 16:32 IST

व्होडाफोन आयडिया आपल्या फॅन्ससाठी होळीचं गिफ्ट घेऊन आली आहे. आता कंपनी काही रिचार्ज पॅकवर दुप्पट डेटा देत आहे. जाणून घ्या कोणकोणते रिचार्ज पॅक.

Vodafone Idea Recharge pack
Vodafone Idea कडून ग्राहकांना होळीचं गिफ्ट, रिचार्ज पॅकवर मिळणार हा फायदा  

Vodafone Idea Recharge Plans: व्होडाफोन आयडियानं आपल्या फॅन्सना होळीच्या आधी गिफ्ट दिलं आहे. आता कंपनी काही रिचार्ज पॅकवर डबल डेटा देत आहे. कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी तीन नवीन डबल डेटा ऑफर सादर करत आहे. या रिचार्ज पॅकवर व्होडाफोन आयडिया पहिल्यांदा दररोज 1.5 जीबी डेटा देत होती. आता त्याजागी 3 जीबी डेटा मिळेल. कंपनीनं 249 रूपये, 399 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्ज प्लान्सवर 3GB डेटा रोज देण्याचा निर्णय घेतला आहे. 

249 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांत एकूण 84GB डेटा मिळेल. म्हणजेच आता ग्राहकांना दररोज 3GB डेटा मिळेल. ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करु शकणार आहेत. त्यासोबतच कंपनी प्रीमियम अॅप्सचं सब्सक्रिप्शन देत आहे.

399 रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा कंपनीनं बदल करत 3GB डेटा दररोज देण्याची घोषणा केली आहे. या प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी 3 जीबी डेटा रोज मिळेल. त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 मॅसेजिंगची सुविधा मिळणार आहे. 

599 रुपयांच्या प्लानमध्येही आता 84 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा मिळेल. त्यासोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 मॅसेजिंगची सुविधा मिळेल. याव्यतिरिक्त कंपनी तुम्हाला प्रीमियम अॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळेल. 

नेटवर्क प्रोवाइडर कंपन्यांमध्ये वाढती स्पर्धा यामुळे कंपन्या त्यांच्या रिचार्ज पॅकमध्ये बदल करीत आहेत. काही काळापूर्वी कंपन्यांनी रिचार्ज पॅकची किंमत वाढविली होती. 

दरम्यान, टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडियानं मोबाईल डेटासाठीची फी वाढवून कमितकमी ३५ रुपये प्रति GB करण्याची मागणी केली आहे. ही फी सध्याच्या फीच्या सात ते आठ पटीनं अधिक आहे. कंपनीनं यासोबतच एका ठराविक मासिक फी सोबत कॉल सेवांसाठी ६ पैसे प्रति मिनिटांचे दर ठरवण्याची मागणी केलीय. कंपनीनं म्हटलंय की, त्यांना एजीआरची थकबाकी फेडण्यासाठी आणि कंपनीचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू करणं आवश्यक आहे.

एजीआरची थकबाकी भरण्यासाठी मागितला १८ वर्षांचा वेळ

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं एजीआरची थकबाकी भरण्यासाठी १८ वर्षांची वेळ मागितली आहे. यासोबतच कंपनीनं म्हटलंय की, त्यांना व्याज आणि दंडातून तीन वर्षांची सूट मिळाली पाहिजे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी