Dangerous Android Apps: 'या' 35 Apps मध्ये आहे खतरनाक Virus, लगेच करा डिलीट; नाहीतर करतील कंगाल

टेक इट Easy
Pooja Vichare
Updated Aug 20, 2022 | 15:51 IST

Google Play Store: 35 लोकप्रिय अँड्रॉइड अॅप्समध्ये मालवेअर आढळले आहेत. हे अॅप लोकांचा वैयक्तिक डेटा चोरतात आणि अनावश्यक जाहिरातीही दाखवतात. अशा परिस्थितीत, यापैकी कोणतेही अॅप तुमच्या फोनमध्ये असल्यास ते त्वरित डिलीट करा.

Dangerous Android Apps
'या' 35 Apps मध्ये आहे खतरनाक व्हायरस 
थोडं पण कामाचं
 • आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक जणाकडे स्मार्टफोन आहे. प्रत्येर जण स्मार्टफोनचा वापर करतो.
 • प्रत्येक स्मार्टफोन यूजर्स त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्यांच्या डिव्हाइसवर विविध स्मार्टफोन अॅप्स डाउनलोड करत असतो.
 • सायबर सिक्युरिटी टेक्नॉलॉजी कंपनी बिटडेफेंडरच्या (Bitdefender) मते, 35 लोकप्रिय अँड्रॉइड अॅप्समध्ये मालवेअर आढळले आहेत.

नवी दिल्ली: Dangerous Android Apps to Delete Immediately: आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक जणाकडे स्मार्टफोन आहे. प्रत्येर जण  स्मार्टफोनचा वापर करतो. प्रत्येक स्मार्टफोन यूजर्स त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्यांच्या डिव्हाइसवर विविध स्मार्टफोन अॅप्स डाउनलोड करत असतो. नेहमी अॅप्स आणि थर्ड पार्टी अॅप्स डाऊनलोड करू नयेत असं सांगितलं जात. मात्र तरीही गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store)असे अनेक अॅप्स आहेत, जे धोकादायक आहेत आणि कधीही डाउनलोड करू नयेत.  सायबर सिक्युरिटी टेक्नॉलॉजी कंपनी बिटडेफेंडरच्या (Bitdefender)  मते, 35 लोकप्रिय अँड्रॉइड अॅप्समध्ये मालवेअर आढळले आहेत. हे अॅप लोकांचा वैयक्तिक डेटा चोरतात आणि अनावश्यक जाहिरातीही दाखवतात. अशा परिस्थितीत, यापैकी कोणतेही अॅप तुमच्या फोनमध्ये असल्यास ते त्वरित डिलीट करा.

हे अॅप्स तुम्हाला करू शकतात कंगाल

सायबर सिक्युरिटी फर्मने सांगितले आहे की, गुगल प्ले स्टोअरवर अनेक स्मार्टफोन अॅप्स उपलब्ध आहेत जे धोकादायक आहेत आणि ते डाउनलोड करू नयेत. हे अॅप्स फोनवर डाऊनलोड झाल्यानंतर त्यांचे नाव बदलतात आणि नंतर ते डिव्हाइसवर लपून  राहतात. अशा प्रकारे, फोनमध्ये लपवून हे अॅप्स वापरकर्त्यांचे तपशील हॅकर्सना पाठवत राहतात आणि तुमचे बँक खाते देखील ऍक्सेस करू शकतात.

ही आहे त्या धोकादायक 35 अॅप्सची यादी

या यादीत कोणते अॅप समाविष्ट आहेत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर वाचा आणि त्या अॅप्सबद्दल जाणून घ्या. या धोकादायक अॅप्समध्ये 

 1. Walls light - Wallpapers Pack
 2. Big Emoji - Keyboard
 3. Grad Wallpapers - 3D Backdrops
 4. Engine Wallpapers - Live & 3D
 5. Stock Wallpapers - 4K & HD
 6. EffectMania - Photo Editor
 7. Art Filter - Deep Photoeffect
 8. Fast Emoji Keyboard
 9. Create Sticker for Whatsapp
 10. Math Solver - Camera Helper
 11. Photopix Effects - Art Filter
 12. Led Theme - Colorful Keyboard
 13. Keyboard - Fun Emoji, Sticker
 14. Smart Wifi
 15. My GPS Location
 16. Image Warp Camera
 17. Art Girls Wallpaper HD
 18. Cat Simulator
 19. Smart QR Creator
 20. Colorize Old Photo
 21. GPS Location Finder
 22. Girls Art Wallpaper
 23. Smart QR Scanner
 24. GPS Location Maps
 25. Volume Control
 26. Secret Horoscope
 27. Smart GPS Location
 28. Animated Sticker Master
 29. Personality Charging Show
 30. Sleep Sounds
 31. QR Creator
 32. Media Volume Slider
 33. Secret Astrology
 34. Colorize Photos
 35. Phi 4K Wallpaper - Anime HD

याचा समावेश आहे. 

तुम्ही कधीही तुमच्या फोनवर हे अॅप्स डाउनलोड केले असतील, तर ते लगेच डिलीट करा. हे देखील शक्य आहे की या अॅप्सनी त्यांची नावे आणि आयकॉन बदलले असतील. अशा परिस्थितीत, तुम्हाला अॅप यादीमधून बारकाईने पाहून त्यांना काढून टाकावे लागेल. 

अधिक वाचा- मुसळधार पावसात वाहून गेला हजारो वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी