Google Bans Apps: गुगलचा मोठा निर्णय! Play Store वरून हटवले हे ॲप्स

टेक इट Easy
Updated May 11, 2022 | 15:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Google Bans All Call Recording Apps । गुगलने मागील महिन्यात प्ले स्टोअरवरीवल सर्व कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. दरम्यान प्ले स्टोअरवरील धोरणातील बदल आजपासून म्हणजेच ११ मे पासून लागू करण्यात आले आहेत.

These apps were removed by Google from the Play Store
गुगलचा मोठा निर्णय! Play Store वरून हटवले हे ॲप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुगलने मागील महिन्यात प्ले स्टोअरवरीवल सर्व कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.
  • गुगलने सर्व कॉल रेकॉर्डिंग ॲप्स हटवले आहेत.
  • काही स्मार्टफोनमध्ये हे फिचर सुरू राहणार आहे.

Google Bans All Call Recording Apps । मुंबई : गुगलने (Google) मागील महिन्यात प्ले स्टोअरवरीवल (Play Store) सर्व कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. दरम्यान प्ले स्टोअरवरील धोरणातील बदल आजपासून म्हणजेच ११ मे पासून लागू करण्यात आले आहेत. इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फिचरसह समोरून येणाऱ्या (Incoming Call) कॉलसाठी कोणताही बदल होणार नाही. क्युपर्टिनो-आधारित टेक जायंट अनेक वर्षांपासून कॉल रेकॉर्डिंग ॲप्स आणि सेवांच्या विरोधात आहे. कारण कॉल रेकॉर्ड करणे हे युजर्सच्या गोपनीयतेचे उल्लंघन असल्याचे कंपनीचे मत आहे. 

अधिक वाचा : तुम्हीही डायबिटीजग्रस्त असून देखील गोड पदार्थ खातायं?

थर्ड पार्टी ॲ​प्सवर बंदी

दरम्यान, गुगलने स्वत:च्या डायलर ॲपवर कॉल रेकॉर्डिंग फिचर "हा कॉल आता रेकॉर्ड केला जात आहे" याची कल्पना देणारे फिचर आणले आहे. म्हणजेच फोनवर बोलत असलेल्या दोन्हीही युजर्संना कॉल रेकॉर्डिंग होत असेल तर माहिती होईल. गुगलने स्पष्ट केले आहे की या बदलाचा परिणाम फक्त थर्ड पार्टी ॲप्सवर होईल. याचा अर्थ Google डायलरवरील कॉल रेकॉर्डिंग तुमच्या डिव्हाइसवर किंवा स्मार्टफोनवर हे फिचर उपलब्ध असले तर ते कार्यरत राहील. एकूणच गुगल प्ले स्टोअरवर कॉल रेकॉर्डिंग सुविधा उपलब्ध असलेल्या ॲप्सवरच बंदी घातली जाईल.

Truecaller ने हटवले कॉल रेकॉर्डिंग फिचर 

Google ने कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी घातल्याच्या एका दिवसानंतर Truecaller ने आपल्या प्लॅटफॉर्मवरून कॉल रेकॉर्डिंग फिचर हटवल्याचे उघड केले आहे. Truecaller च्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आम्ही यापुढे कॉल रेकॉर्डिंगचे फिचर देऊ शकत नाही. तर ज्या डिव्हाइसमध्ये कॉल रेकॉर्डिंग फिचर आहे अशा डिव्हाइसवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. 

या स्मार्टफोनवरून करू शकता कॉल रेकॉर्डिंग 

Truecaller ने म्हटले आहे की, यामुळे काही स्मार्टफोनवर परिणाम होणार नाही. यामध्ये Xiaomi, Samsung, OnePlus आणि Oppo सह काही स्मार्टफोन कंपन्यानी कॉल रेकॉर्डिंगची सेवा चालू ठेवली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी