Virtual Deadly Game: या गेममध्ये हरलात तर पत्करावा लागतो मृत्यू, खेळण्यापूर्वी करा हजारदा विचार

मॉडर्न व्हर्च्युअल रिॲलिटी क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या पामर लक्कीने एक हेडसेट तयार केला आहे. या गेममधील काही परिस्थितीत त्यातून पॉवरफुल मायक्रो-वेव सोडल्या जातात आणि मेंदूवर एक प्रकारे बॉम्बवर्षाव करण्यात येतो.

Virtual Deadly Game
या गेममध्ये हरलात तर पत्करावा लागतो मृत्यू  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हा गेममध्ये पराभूत होणारा खरोखरच मरतो
  • गेम अर्धवट सोडली तरीही होतो मेंदूवर बॉम्बवर्षाव
  • लक्की पामरने तयार केलाय नवा हेडसेट

Virtual Deadly Game: व्हिडिओ गेमच्या (Video Game) क्षेत्रात गेल्या काही वर्षात आमुलाग्र बदल झाले आहेत. अमेरिकेतील एक उद्योजकाने नुकतीच एक डेडली गेम (Deadly Game) बाजारात आणली आहे. ही गेम खेळताना तर खेळ अर्धवट सोडला, तर ती गेम खेळणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो, असा दावा त्याने केला आहे. ही गेम व्हर्च्युअली खेळायची असली, तरी ती खेळणाऱ्या माणसाचा मृत्यू मात्र प्रत्यक्षात, खरोखर होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मॉडर्न व्हर्च्युअल रिॲलिटी क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या पामर लक्कीने एक हेडसेट तयार केला आहे. या गेममधील काही परिस्थितीत त्यातून पॉवरफुल मायक्रो-वेव सोडल्या जातात आणि मेंदूवर एक प्रकारे बॉम्बवर्षाव करण्यात येतो. एका ब्लॉगमधून पामरने दिलेल्या माहितीनुसार, हा हेडसेट ‘नर्व गियर’ डायरेक्ट न्यूरल इंटरफेसचा वापर करून वास्तवाची पुनर्निमिती करत असल्याचा आभास निर्माण करतो. 

गेम पूर्ण न केल्यास मेंदूवर हल्ला

या डिव्हाईसमध्ये वरच्या भागात तीन एक्सप्लोजिव चार्ज मॉड्युल्स देण्यात आले आहेत. निर्मात्यांच्या दाव्यानुसार, ते थेट युजरच्या डोक्यावर हल्ला करतात आणि त्यांना ठार करू शकतात. लक्कीने दिलेल्या माहितीनुसार, “पंप-अप ग्राफिक्स गेमला अधिक वास्तवदर्शी बनवू शकतात. मात्र या गेममध्ये असणारा जिवाचा धोका हा भागच गेमला अधिक वास्तववादी बनवतो. व्हिडिओगेम प्रक्रियेत या घटकाचा विचार यापूर्वी कधीच केला गेला नव्हता. 

अधिक वाचा - हे तर नवं Twitter... पाहा काय आहे Mastodon

धक्कादायक संकल्पना

व्हिडिओ गेमची ही अजब संकल्पना पाहून अनेकांना धक्का बसला आहे. ‘स्वोर्ड आर्ट ऑनलाईन’च्या स्मृतिप्रित्यर्थ हा हेडसेट तयार करण्यात आल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. एनीमे Sword Art Online ने जपानमध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी ही संकल्पना लोकप्रिय केली होती. या गेममध्ये एका वेडा शास्त्रज्ञ लोकांना शंभर मजली इमारतीत अडकवून ठेवतो आणि कोंडून घालतो. या गेममध्ये जर कुणी मरत असेल, तर प्रत्यक्षातही तो मरून जात असल्याचं सांगण्यात येतं. 

अधिक वाचा - Maruti CNG Cars : मारुतीचा धडाका! लॉंच केल्या 30 किमी मायलेज देणाऱ्या 3 नवीन स्वस्त सीएनजी कार...

हेडसेटचे प्रयोजन

व्हर्च्युअली एखादी व्यक्ती मरत असेल, तर प्रत्यक्षात ती कशी मरणार, हा मोठा प्रश्न आपल्याला पडला होता, असं लक्की म्हणतात. त्यावर बराच विचार करण्यात आला आणि अखेर हेडसेटच्या मदतीने हे घडवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जर गेम खेळणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष मारायचं असेल, तर त्यासाठी हेडसेटमध्ये अशी काही रचना करणं आवश्यक होतं, ज्यामुळे त्याच्या मेंदूला जोरदार धक्का बसू शकेल. त्यामुळेच या हेडसेटमध्ये एक्सप्लोजिव्ह चार्ज लावण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हर्च्युअल रिॲलिटीला प्रत्यक्षात साकार करणारा, गेममध्ये मेल्यानंतर प्रत्यक्षही मारणारा आणि गेम अर्धवट सोडली तरी तुमच्या मेंदूवर प्रहार करून मृत्यूस कारणीभूत ठरणारा असा हा हेडसेट आहे. तुम्ही असा हेडसेट खरेदी कराल का? 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी