टिकटॉक संकटात, पाहा झालं तरी काय? 

TikTok: तरुणांपासून सर्वांमध्येच लोकप्रिय असलेलं टिकटॉक अॅप सध्या एक प्रकारे अडचणीत सापडलं आहे. कारण, गुगल प्ले स्टोअरवर त्याच्या रेटिंगमध्ये सलग घसरण होत आहे.

tiktok app rating drops to 1.3 on google play store
फोटो सौजन्य: iStockImages (प्रातिनिधीक फोटो)  

थोडं पण कामाचं

  • टिकटॉक भारतात खूपच प्रसिद्ध
  • टिकटॉकने तरुणांना अक्षरश: वेड लावलं आहे 
  • टिकटॉक १.५ बिलियनहून अधिक नागरिकांनी केलं आहे डाऊनलोड 

नवी दिल्ली: भारतामध्ये प्रसिद्ध असलेलं टिकटॉक हे अॅप सध्या अडचणींचा सामना करत आहे. हे शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग अॅप असून त्याला १.५ बलियनहून अधिक युजर्सने डाऊनलोड केलं आहे. यावर ८०० मिलियनहून अधिक अॅक्टिव युजर्सला बॅकलॅशचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या वर्षी गुगल प्ले स्टोअरवर टिकटॉक अॅपच्या रेटिंगमध्ये घसरण झाली आहे. गुगल प्ले स्टोअरवर या अॅपचं रेटिंग ४.९ वरुन घसरून १.३ स्टार इतकी झाली आहे. या रेटिंगमध्ये सलग घसरण होत असल्याचं पहायला मिळत आहे. भारतात युजर्स हे ट्वीटरवर #bantiktok ट्रेंड करत आहेत. या अॅपला काही जण केवळ १ स्टार देत आहेत. अॅपल अॅप स्टोअरवर मात्र, अद्यापही ४.८ रेटिंग आहे.

काय आहे प्रकरण? 

टिकटॉकवर बॅन लावण्याचा ट्रेंड तेव्हा सुरू झाला जेव्हा, १४ मिलियन फॉलोअर्स असलेल्या एखा लोकप्रिय टिकटॉक युजरने एक व्हिडिओ पोस्ट केला जो महिलांवर होणाऱ्या अॅसिड हल्ल्यांना प्रोत्साहन देतो. हे पूर्वीच्या युट्यूब विरुद्ध टिकटॉक फाइटवरुन समोर आलं आहे. युट्यूबर कॅरीमिनाटी याने टिकटॉक स्टार अमर सिद्धीकीचा एका व्हिडिओ पोस्ट केला होता नंतर हा व्हिडिओ युट्यूबवरुन काढण्यात आला. हे सर्व तेव्हा सुरू झालं जेव्हा टिकटॉक स्टार अमर सिद्दीकेने इंस्टाग्रामवर युट्यूबर्सला कॉल करुन एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत अमर सिद्दीकी याने युट्यूबर्सवर टिकटॉकचं कंटेन्ट कॉपी करण्याचा आणि ब्रँडचं नाव खराब करण्याचा आरोप केला.

रोस्ट टिकटॉक विरुद्ध युट्यूब यांच्याबाबत होता. यामध्ये एका विशिष्ट समुदायाची खिल्ली उडवण्यात आली होती. हा व्हिडिओ अनेकांनी कॅरिमिनाटीद्वारे उपयोग केल्या जाणाऱ्या क्वेरोफोबिक स्लर्सच्या स्वरूपात असल्याचं सांगणअयात आलं. १४ मे रोजी हा व्हिडिओ काढून टाकण्यात आला कारण हा व्हिडिओ पॉलिसीच्या विरोधात होता. या सर्व घटनांमुळे युजर्सने गुगल प्ले स्टोअरवर अॅपला डाऊन रेटिंग करण्यास सुरूवात केली आणि यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

यापूर्वीही काढण्यात आला होता बंदीचा आदेश 

टिकटॉकला यापूर्वीही अडचणींचा सामना करावा लागला आहे. एप्रिल २०१९ मध्ये मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला अॅप डाऊनलोडवर बंदी घालण्याची आणि अॅपवरील व्हिडिओ प्रसारणास रोखण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने म्हटले होती की, हे अॅप पोर्नोग्राीला प्रोत्साहन देतात आणि ते मुलांसाठी धोकादायक आहे. यावरुनच अॅपवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, नंतर ही बंदी काढण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी