TikTok ने भारतातील व्यापार गुंडाळला, जाणून घ्या टिकटॉकची संपूर्ण कहाणी

TikTok closed business in India : भारत सरकारने सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन टिकटॉकसह इतरही काही चायनीज अॅप्सवर बंद घातली. त्यानंतर आता टिकटॉक कंपनीने भारतातील आपला व्यवसाय गुंडाळला आहे.

Tiktok
TikTok  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई : भारत सरकारने (Indian Government) जून २०२० मध्ये टिकटॉक (TikTok) या प्रसिद्ध अॅपसह चीनमधील एकूण ५९ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या अॅप्सचा गैरवापर केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव भारत सरकारने अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. जगप्रसिद्ध असलेलं टिकटॉक अॅप पुन्हा सुरू होईल अशी आशा अनेकांना होती. मात्र, भारत सरकारने या अॅप्सवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे टिकटॉकची मालकी असलेल्या बाईटडान्स (ByteDance) कंपनीने भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाईटडान्स कंपनीतील लाखो व्यक्तींच्या नोकरीवर गदा आली आहे. जाणून घेऊयात टिकटॉकचा व्यापार किती मोठा होता आणि युजर्स किती होते?

एका रिपोर्टनुसार TikTokची आकडेवारी

 1. जगभरात TikTokचे ८० कोटी अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
 2. २०१९ मध्ये TikTok हे अॅप तब्बल ७३८ मिलियन वेळा डाऊनलोड केलं आहे.
 3. १.५ बिलियनहून अधिकवेळा टिकटॉक डाऊनलोड झालं आहे. २०१० मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या अॅप्समध्ये टिकटॉक सातव्या क्रमांकावर.
 4. चीनच्या व्यतिरिक्त २०१९ मध्ये भारतात टिकटॉक डाऊनलोड करण्याच्या यादीत टॉपवर
 5. २०१९ मध्ये अमेरिकेत टिकटॉक अॅफ ४६ मिलियन वेळा डाऊनलोड करण्यात आलं. 
 6. केवळ ९ टक्के अमेरिकन इंटरनेट युजर्सने टिकटॉकता वापर केला आहे. ४९ टक्के किशोरवयीन युजर्सकडून टिकटॉकचा वापर होत होता. 
 7. गायक लोरेन ग्रे याचे टिकटॉकवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. त्याचे टिकटॉकवर तब्बल ४० मिलियन फॉलोअर्स आहेत.
 8. अँड्रॉईड टिकटॉक युजर्सने २०१९ मध्ये ६८ बिलियन तास अॅपवर घालवला आहे. 
 9. टिकटॉकवर वेळ घालवण्याचा दिवसातील सरासरी वेळ हा ४५ मिनिटे होता.
 10. अमेरिकन युजर्सने दिवसभरात जवळपास ८ वेळा हे अॅप ओपन केलं तर प्रत्येकवेळी पाच मिनिटे त्यावर वेळ घालवला. 
 11. टिकटॉकवर भारतीय युजर्सने दिवसभरातील जवळपास ३० मिनिटे वेळ घालवला. 
 12. ग्लोबल वेब इंडेक्सच्या अभ्यासानुसार, २०१८ मध्ये ५५ टक्के युजर्सने अॅपवर व्हिडिओ अलोड केला तर ६८ टक्के वेळा पाहिले गेले. 
 13. २०१९च्या नुसार टिकटॉकचा रेव्हेन्यु १७६.९ (१२ कोटी ९० लाख) मिलियन डॉलर्स 
 14. बाईटडान्सच्या चीनी डिजिटल अॅपचे बाजारात एकूण २३ टक्के नियंत्रण 
 15. सॉफ्टबँकच्या ३ बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतर बाईटडान्स जगातील सर्वात हाय व्हॅल्यु असलेली खासगी कंपनी बनली आहे. ज्याचे एकूण व्हॅल्युएशन ७८ बिलियन डॉलर आहे. 
 16. भारतात TikTokचे जवळपास २० कोटी युजर्स होते 
 17. बाईटडान्स कंपनीचे भारतात एकूण ७ कार्यालय होते. जे गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई येथे होते. 
 18. भारतात अॅपवर बंदी घातल्याने बाईटडान्स कंपनीला दररोज जवळपास ३ कोटी ६४ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. 
 19. कंपनीच्या भारतातील मुख्य कार्यालयात २ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत होते आणि कोरोनामुळे ९५ टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी