Tips and Tricks: नको असलेले कॉल्स ब्लॉक करण्यासाठी करा 'हा' उपाय

टेक इट Easy
Updated Jun 13, 2019 | 15:41 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Technology Tips: नको असलेल्या कॉल्समुळे तुम्ही त्रस्त झाला आहात? मग आता काळजी करु नका. तुम्ही अवघ्या काही स्टेप्स वापरुन हे स्पॅम कॉल्स ब्लॉक करु शकता. पाहा काय आहेत या सोप्या स्टेप्स...

Ways to block unwanted calls
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: आपल्यापैकी अनेकजण हे टेलिकॉलर्स आणि स्पॅम कॉल्समुळे त्रस्त आहेत. टेलिकॉलर्स संपूर्ण दिवस कुठल्या ना कुठल्या प्रकारची स्कीम सांगण्यासाठी कॉल करत असतात. या टेलिकॉलर्स पासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण आपल्याकडे सेव नसलेल्या नंबरवरुन येणारे कॉल्सही उचलत नाहीत. मात्र, याच दरम्यान काहीवेळा महत्वाचे कॉल्स मिस होतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही स्टेप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही हे कॉल्स सहज ब्लॉक करु शकता.

टेलिकॉलर्स कडून येणारे कॉल्स हे दरवेळेला नवनव्या नंबर वरुन येत असतात. त्यामुळे नंबर ब्लॉक करायचा असेल तर नेमका कुठला करायचा हेच कळत नाही. पण काही सोप्या स्टेप्सचा वापर केला तर तुम्ही हे कॉल्स ब्लॉक करु शकता. एअरटेल, आयडिया वोडाफोन, रिलायन्स जिओ सोबतच इतरही नेटवर्कवर येणारे कॉल्स तुम्ही ब्लॉक करु शकता. पाहूयात काय आहेत या सोप्या टिप्स...

सर्वातआधी तुम्हाला स्पॅम कॉल्स बद्दल जाणून घ्याव लागेल. एकूण तीन प्रकारचे स्पॅम कॉल्स असतात. रिअल कंपनीकडून येणारे कॉल्स जे तुम्हाला काही विकण्यासाठी कॉल करतात. रोबोटिक किंवा प्री रेकॉर्डेड कॉल्स आणि तिसरे आहेत स्पॅम कॉल्स जे खरोखर तुम्हाला चूना लावून फसवणूक करण्यासाठी केलेले असतात. ट्रायच्या नियमांनुसार, डीएनडी (DND) सुविधेच्या सहाय्याने तुम्ही हे कॉल्स रोखू शकता. पाहूयाच यांच संदर्भात अधिक माहिती...

असा करा DND मेसेज

  1. सर्वातआधी फोनमधील मेसेज ओपन करा
  2. त्यानंतर क्रिएट मेसेज मध्ये जा
  3. त्यामध्ये START (Space) मोबाइल नंबर लिहा
  4. मग हा मेसेज 1909 या क्रमांकावर पाठवा

कॉल करुन ब्लॉक करण्याचा पर्याय

कॉल करण्यासाठी तुमच्या फोनवरुन 1909 या क्रमांकावर कॉल करा आणि त्यानंतर येणाऱ्या सूचना (इंस्ट्रक्शन) फॉलो करा. मग तुमच्या मोबाइल नंबरवर डीएनडी DND सुविधा सुरू होईल आणि नको असलेले कॉल्स तुम्हाला येणारच नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Tips and Tricks: नको असलेले कॉल्स ब्लॉक करण्यासाठी करा 'हा' उपाय Description: Technology Tips: नको असलेल्या कॉल्समुळे तुम्ही त्रस्त झाला आहात? मग आता काळजी करु नका. तुम्ही अवघ्या काही स्टेप्स वापरुन हे स्पॅम कॉल्स ब्लॉक करु शकता. पाहा काय आहेत या सोप्या स्टेप्स...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola