मुंबई: Toyota booking closed for Innova Crysta: टोयोटानं (Toyota) एका कारचं बुकिंग तात्पुरते बंद केलं आहे. कंपनीकडून हे बुकिंग (Booking) डिझेलच्या व्हेरिएंटसाठी बंद करण्यात आलं आहे. यामागे डिझेल व्हेरिएंटचा वेटिंग पीरियड (Waiting Period) असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
या कारचं बुकिंग बंद
Toyota Kirloskar Motor (TKM) डीलरशिपने Toyota Innova Crysta च्या डिझेल व्हेरिएंटसाठी बुकिंग तात्पुरते बंद केलं आहे. यामागे डिझेल व्हेरिएंटचा प्रतीक्षा कालावधी सांगितला जात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
अधिक वाचा- आजपासून पुढचे दिवस 'या' जिल्ह्यात पावसाचा Yellow Alert
कंपनीचं स्पष्टिकरण
कंपनीने म्हटले आहे की, टोयोटा इनोव्हा 2005 मध्ये लॉन्च झाल्यापासून खूप पुढे गेली आहे. इनोव्हा या सेगमेंटमधील इतर मॉडेल्सपेक्षा नेहमीच पुढे राहिली आहे. भारतातील ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी इनोव्हाने अनेक वर्षांमध्ये अनेक बदल केले असल्याचंही कंपनीनं सांगितलं. लक्झरी, आराम किंवा परफॉर्मन्स असो, तसंच दुसऱ्या जनरेशनची इनोव्हा क्रिस्टानं सेंगमेंट लीडर म्हणून ग्राहकांची मनं कायम जिंकली आहेत.
भारतात सुमारे 10 लाख लोकांकडे ही कार
ही वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रातील ग्राहकांना खूप आवडते. सध्या मोठ्या प्रमाणावर या कारची मागणी असल्याने, इनोव्हा क्रिस्टलच्या डिझेल मॉडेलसाठी वेटिंग पीरियड लक्षणीय वाढला आहे. अशा परिस्थितीत कंपनीनं डिझेल मॉडेलच्या ऑर्डर घेणे तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात सुमारे 10 लाख लोकांकडे ही कार आहे.
पेट्रोल व्हेरिएंटसाठी बुकिंग सुरूच
कंपनीने यावर बोलताना म्हटलं की, ज्या ग्राहकांनी आमच्या डीलर्सकडे आधीच बुकिंग केले आहे त्यांना आम्ही ही कार पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय, आम्ही इनोव्हा क्रिस्टलच्या पेट्रोल मॉडेलसाठी ऑर्डर घेणे सुरू ठेवणार आहोत.
अधिक वाचा- दिवसभर गरम पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते का?, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
टोयोटा किर्लोस्कर मोटरने जुलैमध्ये 19,693 वाहनांसह एका महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली. जुलै 2021 मध्ये विक्री झालेल्या 13,105 युनिटच्या तुलनेत कंपनीची विक्री 50 टक्क्यांनी जास्त होती.