या तारखेपासून नाही करू शकणार मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी, लवकरच येणार नवीन नियम 

टेक इट Easy
Updated Oct 18, 2019 | 18:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mobile Port Number: ट्राय लवकरच मोबाईल पोर्टेबिलीटीसंदर्भात नवीन नियम लागू करणार आहेत. नव्या नियमांपूर्वी मोबाईल पोर्टेबिलीटी सेवा काही दिवसांसाठी बंद राहणार आहे. 

trai new rule over mobile number portability will come by 11 november technology news in marathi google batmya
पोर्टेबिलीटीचे लवकरच येणार नवे नियम 

थोडं पण कामाचं

  • ट्राय लवकरच मोबाईल नंबर पोर्टेबिलीटीचे नवीन नियम लागू करणार 
  • ग्राहक ४ नोव्हेंबरपासून १० नोव्हेंबर दरम्यान मोबाईल पोर्टेबिलीटी नाही करू शकणार 
  • ट्राय ११ नोव्हेंबरला पोर्टेबिलीटीचे नवीन नियम लागू करणार आहे

नवी दिल्ली :  ट्राय लवकरच मोबाईल नंबर पोर्टेबिलीटीसंबंधी नवीन नियम लागू करणार आहे. दूरसंचार नियामक ट्रायने गुरूवारी याची माहिती दिली आहे. मोबाईल पोर्टेबिलीटी संदर्भातील नवे नियम येत्या ११ नोव्हेंबरपासून प्रभावीपणे लागू होणार आहे. जे नवे आणि सरळ असणार आहेत. ट्रायने दिलेल्या माहितीनुसार नवी व्यवस्थेमुळे ग्राहक ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आपल्या मोबाईलची पोर्टबिलीटी करू शकणार नाही. 

या कालावधीत ग्राहक आपल्या मोबाईल नंबर बदलल्याशिवाय ऑपरेटर चेंज करू शकणार नाही, किंवा त्या संदर्भात अर्जही करू शकणार नाही. पोर्टेबिलीटीची नवी सेवा ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.  त्यानंतर ग्राहक पोर्टेबिलीटीसाठी अर्ज करू शकणार आहोत. 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) एका अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या सुविधेत जर ग्राहकांने एक सेवा क्षेत्रात मोबाईल कंपनी बदलण्यासंदर्भात अर्ज करत असेल तर ही प्रक्रिया कामकाजाच्या दोन दिवसात पूर्ण होणार आहे. तर एका सर्कलमधून दुसऱ्या सर्कलच्या नंबर पोर्टेबिलिटीच्या अर्जावर पाच दिवसात प्रक्रिया पूर्ण होणार ाहे. 

आता या प्रक्रियेला सात दिवसांचा कालवधी लागतो. आता पोर्टेबिलीटीचे सुविधा ही जलद आणि सोईस्कर होणार असल्याचा दावा ट्रायने केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी