नवी दिल्ली: व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपली प्रायव्हसी पॉलिसी (privacy policy) अपडेट (update) केली आहे ज्यामुळे व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची (WhatsApp users) चिंता (worry) वाढली आहे. मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपची नवी पॉलिसी (new policy) म्हणते की व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या सर्वांचा सर्व प्रकारचा डेटा (data), व्यवहाराचे तपशील (transactions details), संपर्क (contacts), ठिकाणे (locations) आणि इतर महत्वाची माहिती (important info) हस्तगत करून ती कोणत्याही उद्देशासाठी वापरण्याचा (usage) हक्क कंपनीला (company) असेल.
जे लोक व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत त्यांना या नियम आणि अटींना संमती द्यावी लागेल, असे न केल्यास त्यांना व्हॉट्सअॅपचा वापर करता येणार नाही. ही संमती देण्यासाठी ८ फेब्रुवारी २०२१ ही शेवटची तारीख आहे. भारतात ४० कोटीपेक्षाही जास्त लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आपल्या खासगी आणि व्यावसायिक कामांसाठी याचा वापर भरपूर प्रमाणात होतो. एका रितीने व्हॉट्सअॅप हा लोकांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे ज्यामुळे ही नवी पॉलिसी लोकांसाठी डोकेदुखी झाली आहे.
लोक व्हॉट्सअॅपवरील आपला राग व्यक्त करत आहेत आणि त्याला पर्याय म्हणून काम करू शकणाऱ्या अॅप्सच्याही शोधात आहेत. ज्या लोकांना या नव्या अटींबद्दल आक्षेप आहेत त्यांच्यासाठी हे काही पर्याय आहेत जे व्हॉट्सअॅपची जागा घेऊ शकतात.
सिग्नल
टेलिग्राम
सायलेन्स
हाईक
वीचॅट
व्हॉट्सअॅपच्या नव्या नीतीनंतर सिग्नल हा अॅप एकदम चर्चेत आला आहे. लोक मोठ्या प्रमाणावर हा अॅप डाऊनलोड करत आहेत. भारतात या अॅपने व्हॉट्सअॅपला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. अनेक इतर देशांमध्येही याचा वापर वाढत आहे. हा अॅप सुरक्षित मेसेज, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा देतो. याशिवाय इथे आपण ग्रुप तयार करू शकता. मात्र एकाच वेळी अनेक लोकांना मेसेज करण्याची सुविधा मात्र हा अॅप देत नाही. यात प्रायव्हसी चांगली आहे आणि नुकतीच या अॅपने ग्रुप कॉलिंगची सोयही दिली आहे.
एन्क्रिप्टेड मेसेजिंगसाठी हा अॅप खूप लोकप्रिय आहे. यात स्टँडर्ड चॅटसाठी क्लायंट सर्व्हर एन्क्रिप्शन दिले जाते. कोणतीही तिऱ्हाईत व्यक्ती आपले चॅट वाचू शकत नाही. व्हॉट्सअॅपप्रमाणेच यात चॅट, ग्रुप चॅट अशा साध्या गोष्टी मिळतातच. व्हॉट्सअॅपमध्ये २५६ लोकांचा ग्रुप तयार करता येतो तर इथे ही मर्यादा २ लाख आहे. याशिवाय बॉट, पोल, क्विझ, हॅशटॅग अशा सेवाही हा अॅप देतो.
याव्यतिरिक्त सायलेन्स, हाईक आणि वीचॅटसारखे इतरही मेसेजिंग अॅप्स आहेत.