Twitter: ट्विटरवर 'ब्लू टिक' हवी आहे? महिन्याला मोजावे लागतील इतके पैसे; मस्क यांचा निर्णय

टेक इट Easy
Pooja Vichare
Updated Nov 02, 2022 | 08:49 IST

Twitter blue tick monthly subscription: ट्विटरवर ब्लू टिकसाठी दरमहा 660 रुपये द्यावे लागतील, अशी घोषणा एलॉन मस्क यांनी केली आहे.

twitter blue tick monthly subscription
ट्विटरच्या ब्लू टिकसाठी मस्क यांची मोठी घोषणा, आता मोजा इतके पैसे 
थोडं पण कामाचं
  • एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले आहे.
  • जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी मोठे बदल करत आहेत.
  • जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे (Twitter) प्रमुख बनले आहेत.

मुंबई:  Twitter blue tick subscription: एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले आहे. आता ते त्यातून पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. ट्विटर ब्लू टिकचे (Twitter Blue Tick)मासिक सबस्क्रिप्शन 8 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 660 रुपये ठेवण्यात आले आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी मोठे बदल करत आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क  (Elon Musk) मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे (Twitter) प्रमुख बनले आहेत. मस्क ट्विटरचे प्रमुख बनल्यानंतर केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर वापरकर्त्यांसाठीही बरेच बदल झाले आहेत. 

अधिक वाचा-  Shocking!, दिला नाही मोबाईलच्या Hotspot चा पासवर्ड, गमवावा लागला जीव

कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरच्या नवीन मालकाने संचालक मंडळ बरखास्त केलं आणि स्वतःला मंडळाचा एकमेव सदस्य बनवलं. एलॉन मस्कने सांगितले की, ट्विटरवर ब्लू टिकसाठी 8 डॉलर (जवळपास 650 रुपये) खर्च येईल, 1,600 रुपये नाही. यावर त्यांनी ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. 

Twitter ने आणलं धमाकेदार फिचर

ट्विटरने अँड्रॉइड आणि iOS दोन्हीवर लिंक्डइनवर ट्विटचे शेअरींग देखील जोडले आहे. ज्या वापरकर्त्यांनी त्यांचे ट्विटर अकाउंट लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट केले आहे ते आता त्यांचे ट्विट थेट इंस्टाग्राम स्टोरीज आणि स्नॅपचॅटवर शेअर करू शकतात. Instagram स्टोरींसाठी, फक्त शेअर बटण टॅप करा, नंतर Instagram चिन्हावर टॅप करा आणि तुमचे काम पूर्ण झाले. स्नॅपचॅट आणि लिंक्डइनसाठी प्रक्रिया समान आहे. ट्विटर आधीच युजर्सना फेसबुक न्यूज फीड, फेसबुक ग्रुप्स, मेसेंजर चॅट, जीमेल चॅट, टेलिग्राम आणि सिग्नलवर ट्विट शेअर करण्याची परवानगी देते.

ट्विटरने नुकतेच हे फीचर सुरू केले आहे

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्विटरने नुकतेच युजर्ससाठी ट्विट एडिट बटण सादर केले आहे, फक्त ब्लू टिक वापरकर्ते ते आधी वापरू शकतील. यामुळे युजर्स ट्विट प्रकाशित झाल्यानंतर त्यांचे ट्विट संपादित करू शकतील. मात्र, हे ट्विट निश्चित करण्यासाठी कालमर्यादा असेल. कंपनीचे म्हणणे आहे की वापरकर्ते त्यांचे ट्विट प्रकाशित झाल्यानंतर 30 मिनिटांत अनेक वेळा ट्विट संपादित करू शकतील. हे संपादित ट्विट आहे हे जाणून घेण्यासाठी ते चिन्ह, टाइमस्टॅम्प आणि लेबलसह दिसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी