Twitter down: जगभरात ट्विटर ठप्प; युजर्स हैराण

Twitter Down globally: जगभरात ट्विटरची सेवा ठप्प झाल्याचं पहायला मिळत आहे. यामुळे युजर्सला अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

twitter down globally many users facing problem while signing in
Twitter down: जगभरात ट्विटर ठप्प; युजर्स हैराण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ट्विटरच्या सेवेवर परिणाम, जगभरात सेवा ठप्प
  • ट्विटर डाऊन झाल्याने युजर्सला करावा लागतोय अडचणींचा सामना
  • ट्विटरवर लॉग इन करण्यात युजर्सला येत आहेत अडचणी

Twitter down: गुरुवारी (29 डिसेंबर 2022) सकाळी-सकाळी ट्विटर सेवा ठप्प झाली आहे. सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ट्विटरची सेवा ठप्प झाल्याने युजर्सला अडचणींचा सामना करावा लागत आहे. जगभरातील अनेक युजर्सला या समस्येचा सामना करावा लागत आहे. ट्विटर युजर्स आपल्या आयडीने लॉग इन करत असताना लॉग इन होत नसल्याची तक्रार युजर्सकडून होत आहे. (twitter down globally many users facing problem while signing in read in marathi)

भारतातही ट्विटर युजर्सला लॉग इन करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही युजर्सच्या मते, लॉग इन अकाऊंट आधी आपोआप बंद झाले आणि त्यानंतर पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ओपन होत नाहीये. रिफ्रेश किंवा लॉग आऊट करा असा मेसेज डिस्प्ले होत आहे. मात्र, रिफ्रेश केल्यावर किंवा लॉग आऊट केल्यावर पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला असताही लॉग इन होत नाहीये.  

twitter down 2

ट्विटर अ‍ॅप असो किंवा डेक्सटॉप असो दोन्हीकडेही ट्विटर युजर्सला लॉग इन करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'Something went wrong, but don't fret - it's not your fault. Let's try again'असा मेसेज डिस्प्ले होत आहे.

हे पण वाचा : तुळशीची पाने तोडताना या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा...

ट्विटरवर लॉग इन करण्याचा जो ऑप्शन आहे तेथे वारंवार रिफ्रेश करण्यासाठी सांगण्यात येत आहे. मात्र, तसे केल्यानंतरही लॉग इन होत नाहीये. जवळपास एक तासापासून ही समस्या ट्विटर युजर्सला भेडसावत आहे. त्यामुळे नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडला.

हे पण वाचा : फाटलेल्या नोटा बदलून घेण्याचं नका घेऊ टेन्शन, या ठिकाणी करा एक्सचेंज

पण अखेर जवळपास तास - दिड तासानंतर ट्विटरची सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत ट्विटरची सेवा ठप्प झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर जवळपास तीन वेळा ट्विटरची सेवा ठप्प झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी