Twitter Data for Sell : कोट्यवधी युजर्सचा पर्सनल डेटा विक्रीसाठी उपलब्ध, हॅकर्सनी लावलीय एवढी किंमत

जगभरातील कोट्यवधी ट्विटर युजर्सचा पर्सनल डेटा हॅकर्सनी चोरला असून आता तो विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.

Twitter Data for Sell
कोट्यवधी युजर्सचा पर्सनल डेटा विक्रीसाठी उपलब्ध  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ट्विटर युजर्सचा पर्सनल डेटा चोरीला
  • हॅकर्सनी घेतला सुरक्षेतील कमतरतांचा फायदा
  • आता हजारो डॉलर्सना डेटा विक्रीसाठी उपलब्ध

Twitter Data for Sell : जगभरात ट्विटर वापरणारे (Twitter users) कोट्यवधी युजर्स आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या सुरक्षायंत्रणेत (cyber security) काही त्रुटी (Loopholes) असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे अनेक युजर्सचा डेटा (Data hacking) मिळवण्यात हॅकर्सना (Hackers) यश आलं आहे. एका रिपोर्टनुसार ट्विटरच्या डेटाबेसमध्ये असलेल्या त्रुटींचा गैरफायदा घेत हॅकर्सनी 5.4 मिलियन युजर्सचा पर्सनल डेटा (Personal Data) चोरला आहे. जानेवारी महिन्यात Hackeroneनं दिलेल्या रिपोर्टनुसार सुरक्षा यंत्रणेतील कमतरतांमुळे युजर्सचे नंबर, ईमेल आयडी हॅक करणं सहज शक्य होत असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे प्रत्येक युजरचा फोन नंबर आणि ट्विटर आयडीदेखील शोधता येत होता. 

प्रायव्हसी सेटिंग निरुपयोगी

प्रायव्हसी सेटिंग ऑन केलेल्या युजर्सकडूनही हा डेटा हॅक केला जात होता. त्यामुळे तुमची माहिती जाहीर करण्याचा पर्याय निवडा किंवा गुप्त ठेवण्याचा, तुमची माहिती हॅक करणं हॅकर्सना शक्य होत होतं, अशी माहिती आता पुढे आली आहे. कुठल्याही युजरचा फोन नंबर किंवा ईमेल हॅक केला तर त्याचा ट्विटर आयडी शोधून काढणं सहज शक्य होत असल्याचं दिसून आलं. 

ऑथोरायझेशन प्रोसेस

अंड्रॉईड फोन वापरणाऱ्यांसाठी ट्विटरकडून की ऑथोरायझेशन प्रक्रिया होते, ती याला कारणीभूत असल्याचं म्हटलं गेलंय. ट्विटर अकाउंटचं डुप्लिकेशन कऱण्यासाठी या प्रक्रियेचा वापर करण्यात येत होता, हे दिसून आलं आहे. 

अधिक वाचा - भाजप उपाध्यक्षांनी फार्महाऊसवरच थाटला वेश्या व्यवसाय; ५०० कंडोम सापडले, ७३ जण अटकेत

प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट

एका युजरने ट्विटरला प्रूफ ऑफ कॉन्सेप्टबाबत माहिती दिली होती. ट्विटरनेही हा मुद्दा योग्यच असल्याचं मान्य केलं होतं. यावर रिसर्च करणाऱ्या व्यक्तीला ट्विटरकडून 4.02 लाख रुपयांचं बाउंटी अवॉर्डही जाहीर करण्यात आलं होतं. या एररवर आता कंपनीने काम केलं असून त्यावाटे होणारं हॅकिंग रोखण्यात यश मिळाल्याचं सांगितलं आहे. मात्र ही चूक दुरूस्त करण्यापूर्वीच हॅकर्सनी त्याचा गैरफायदा उठवल्याचं दिसून आलं आहे. ही त्रुटी ट्विटरने ओळखून त्यावर उपाय करण्यापूर्वीच हजारो युजर्सचा डेटा चोरून नेण्याचं काम हॅकर्सनी केलं आहे. 

अधिक वाचा - Sideways Skyscraper : सौदीच्या वाळवंटात बनणार १२० किमी लांबी आणि १६०० फूट उंचीच्या दोन इमारती

युजर्सची माहिती विक्रीसाठी उपलब्ध

ट्विटरमध्ये असलेल्या त्रुटींचा गैरफायदा घेत चोरलेली माहिती आता हॅकर्सनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. या माहितीची विक्री झाली तरच हॅकर्सना फायदा होतो. अन्यथा नुसत्या माहितीमुळे त्यांना काहीच मिळत नाही. अनेक कंपन्या ही माहिती विकत घेण्यासाठी उत्सुक असतात. मात्र बेकायदेशीररित्या अशी माहिती विकत घेतल्याचं सिद्ध झालं तर कायदेशीर कारवाईत अडकावं लागत असल्यामुळे जाहीरपणे कुणीही हॅकर्सचा डेटा विकत घेत नाही. सध्या एका हॅकरने हा डेटा विक्रीसाठी उपलब्ध केला असून त्यासाठी 30 हजार डॉलरची मागणी केली आहे. ट्विटरकडून आता सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली असून युजरचा पर्सनल डेटा सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी