वोडाफोन आयडिया देतंय अनलिमिटेड हाय स्पीड डेटा, पण...

वोडाफोन आयडियाने प्रिपेड वापरकर्त्यांसाठी रात्रीचा अमर्याद ड़ेटा देऊ केला आहे. जाणून घेऊयात वोडाफोन-आयडियाचा हा प्लान नेमका आहे तरी काय?

Vodafone Idea launches binge all night offer with unlimited high speed data
वोडाफोन आयडिया देतंय अनलिमिटेड हाय स्पीड डेटा, पण... 

थोडं पण कामाचं

  • वोडाफोन आयडिया देणार रात्रीचा अनलिमीटेड डेटा
  • २४९ रुपयांपेक्षा जास्तचे रिचार्ज केल्यास मिळणार लाभ

वोडाफोन आयडियाने(व्हीआय) आपल्या प्रिपेड वापरकर्त्यांसाठी रात्रीचा अमर्याद ड़ेटा देऊ केला आहे. जे ग्राहक २४९रुपये व त्यापेक्षा जास्तीच्या डेटा पॅकचे रिचार्ज करतात, ते रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अमर्याद डेटाचा वापर करू शकतील. व्हीआयनुसार रात्रीच्या वेळी इंटरनेट वापरासोबतच ओटीटीवर बिंज करण्यासाठी सर्वात जास्त डेटाचा खप होतो.

टेलीकॉम ऑपरेटरने घोषणा केली की, प्रिपेड वापरकर्ते रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत या प्लॅनचा वापर करू शकणार आहेत. व्हीआय सध्याच्या व जे नव्याने २४९ रूचे रिचार्ज करतील त्या ग्राहकांना हा फायदा देणार आहे. किमान रिचार्ज व्यतिरिक्त यावर कसलाच खर्च करावा लागणार नाही. ग्राहकांना आठवड्याच्या शेवटी डेटा रोलओव्हरचाही लाभ मिळणार आहे. यात व्हीआय ग्राहकांना सोमवार ते शुक्रवार पूर्ण तर, शनिवार आणि रविवारी मर्यादित डेटा वापर करण्यास परवानगी मिळणार आहे.

महामारीमुळे घरात बसणाऱ्या लोकांत इंटरनेट व ओटीटीसाठी डेटाचा वापर वाढला आहे. यामध्ये, तरूण वर्ग रात्रीच्या वेळी सर्वात जास्त डेटाचा उपयोग करतो. हाय-स्पीड डेटाचा वापर गेम खेळण्यासाठी सर्वाधिक होतो. व्हीआयनुसार ही नवी युक्ती वापरकर्त्त्यांना आकर्षीत करण्यासाठी आहे.

Ooklaच्या आकड्यांनुसार व्हीआयकडे ४G डाऊनलोड व अपलोडचा वेग फार जास्त आहे. मागील तिमाहीत तो वेग १३.७४ Mbps आणि ६.१९Mbps येवढा होता. एअरटेल १३.५८ Mbps डाउनलोड आणि ४.५६ Mbps अपलोड स्पीडसह दुसऱ्या स्थानावर राहिली. त्यानंतर, जिओ क्रमशः ९.७९ Mbps आणि ३.४१ Mbps डाउनलोड व अपलोड स्पीडसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी