मुंबई : वोडाफोन (Vodafone) - आयडिया (Idea) म्हणजेच वी (Vi) आपल्या 2595 रुपयांच्या प्रीपेड प्लानवर ग्राहकांना बोनस डेटा देत आहे. मात्र, ही ऑफर केवळ कंपनीच्या मोबाइल अॅपवरुन रिचार्ज करणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. वोडाफोन-आयडिया वेबसाईटच्या माध्यमातून रिचार्ज करणाऱ्या युजर्सला प्लानसोबत मिळणाऱ्या सुविधा मिळणार आहेत. 2595 रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता 1 वर्षांची आहे. हा प्लान वी (Vi) चा सर्वात महाग प्रीपेड प्लान आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना 50GB बोनस डेटा मिळत आहे.
वी मोबाइल अॅपवर 2595 रुपयांच्या प्लानमधील डिटेल्समध्ये पाहिलं जाऊ शकतं की, आता युजर्सला अतिरिक्त 50GB डेटाची ऑफर दिली जात आहे. या प्लानची ऑफर संपेपर्यंत 50GB डेटा ग्राहकांना वापरता येणार आहे. म्हणजेच 365 दिवस युजर्स या डेटाचा वापर करु शकतात. ही ऑफर कधीपर्यंत सुरू राहणार आहे याची माहिती अद्याप कंपनीकडून देण्यात आलेली नाहीये. मात्र, ही ऑफर ठराविक वेळेपर्यंत असण्याची शक्यता आहे.
सामान्यत: युजर्सला या प्लान अंतर्गत 730 GB डेटा मिळत होता. मात्र, बोनस डेटा ऑफर अंतर्गत युजर्सला 2595 रुपयांच्या प्लानसोबत 780GB डेटा मिळणार आहे. ही ऑफर वी च्या वेबसाईटवरुन रिचार्ज करणाऱ्या युजर्ससाठी लागू असणार नाहीये. ही एक एक्सक्लुझिव्ह ऑफर आहे.
वोडाफोन-आयडियाच्या 2595 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 100 SMS दररोज मिळणार आहेत. 2GB डेटा दररोज फेअर युसेज पॉलिसी (FUP) डेटा आणि अनलिमिटेड वॉईस कॉलिंग सुविधा मिळणार आहे. यासोबतच युजर्सला एका वर्षासाठी ZEE5 प्रीमियम या ओटीटी प्लॅटफॉर्मचाही लाभ घेता येणार आहे.