New Whatsapp Feature : व्हॉट्सअपचं भन्नाट फिचर! आता इतरांपासून लपवू शकता तुमचा नंबर

सतत नवनवे फिचर्स आणणाऱ्या व्हॉट्सअपनं आता काही एक नवं फीचर आणण्याची तयारी केली आहे. यापुढे तुम्हाला तुमचा नंबर इतरांपासून लपवणं शक्य होणार आहे.

New Whatsapp Feature
आता व्हॉट्सअपवर इतरांपासून लपवू शकता नंबर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • व्हॉट्सअपचं नवं फीचर
  • इतरांपासून लपवता येईल नंबर
  • व्हॉट्सअप ग्रुप मेंबर्सना मिळणार प्रायव्हसी

New Whatsapp Feature : व्हॉट्सअप हे मेसेजिंग ॲप जगात सर्वाधिक वापरलं जातं. केवळ वैयक्तिक कारणांसाठीच नव्हे तर अनेक ठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठीदेखील व्हॉट्सअपचा वापर कऱण्यात येतो. सतत नवनवी फीचर्स आणून ग्राहकांच्या पसंतीला उतरण्याचा प्रयत्न नेहमीच व्हॉट्सअपकडून केला जातो. त्यासाठी ग्राहकांची गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या सुधारणा यात करण्यात येतात. युजर्सना अधिकाधिक सोयीचं हे ॲप वाटावं आणि त्यांच्या मानसिक गरजांचीही पूर्तता व्हावी, यासाठीदेखील कंपनी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं दिसतं. युजर्सच्या प्रायव्हसीची काळजी घेण्यासाठी वेगवेगळी फिचर्स नव्याने आणली जातात आणि त्यात उत्तरोत्तर सुधारणा होत असल्याचं दिसतं. सध्या व्हॉट्सअपनं अशाच एका नव्या फीचरला प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली आहे. 

काय आहे फीचर?

मोबाईल नंबर मिळाल्याशिवाय आपण एकमेकांना व्हॉट्सअपवरून संपर्क साधू शकत नाही. मोबाईल नंबर हाच व्हॉट्सअप नंबर असतो. आपण आपला नंबर कुणाला द्यावा, हा पूर्णतः आपला अधिकार आहे. मात्र आपण एखाद्या व्यक्तीला आपला नंबर दिला आणि त्या व्यक्तीने जर आपल्याला एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं, तर मात्र त्या ग्रुपमधील अनेकांकडे आपला नंबर जातो. ग्रुपमधील तपशील पाहून अनेकजण आपला नंबर मिळवतात आणि तो सेव्ह करून ठेऊ शकतात. त्यामुळे अनेकदा आपली इच्छा नसणाऱ्या व्यक्तींनाही आपले नंबर मिळतात आणि त्यामुळे नाहक आपला त्रास वाढतो. ग्राहकांची हीच समस्या लक्षात घेऊन व्हॉट्सअपनं नवं फीचर बाजारात आणलं आहे. या फीचरद्वारे आता आपला मोबाईल नंबर लपवून ठेवणं शक्य होणार आहे. 

अधिक वाचा - Iphone Vs Android : आयफोन आणि अँड्रॉईडमध्ये काय आहे वेगळेपण? किंमतीत का असतो एवढा फरक? वाचा सविस्तर

असा होणार वापर

नवं फीचर लॉन्च झाल्यावर जर तुमचा नंबर एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला कुणी ॲड केला, तर त्या ग्रुपमधील सदस्यांना तो पाहता येणार नाही, असा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्या ग्रुपमधील जे नंबर तुमच्याकडे सेव्ह नाहीत, अशा नंबरना तुमचं फक्त नाव दिसेल, पण नंबर दिसणार नाही किंवा सेव्ह करता येणार नाही. एखाद्या ग्रुपमध्ये आपल्या नावासोबत नंबर दिसावा की नको, याचा निर्णय तुम्ही करू शकणार आहात. 

अधिक वाचा - Royal Enfield चा नाद खुळा !, आता स्वस्तात मस्त खरेदी करा Hunter 350

सुरु आहे टेस्टिंग

एखाद्या ग्रुपमध्ये तुम्हाला कुणीही ॲड केलं तरी ‘बाय डिफॉल्ट’ तुमचा मोबाईल नंबर इतरांना दिसणार नाही. तो इतरांना दिसावा, असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे फिचर ऑन करू शकता. तुम्ही जाणीवपूर्वक ते ऑन केलं नाही, तर मात्र तुमचा नंबर इतरांना दिसणार नाही. सध्या हे फिचर डेव्हलपमेंटच्या पातळीवर असल्याची माहिती आहे. अजून हे बिटा टेस्टर्सनाही मिळालेलं नाही. 

अधिक वाचा - Iphone 13 cheaper : आयफोन 14 च्या लॉन्चची तयारी, आयफोन 13 च्या किंमती उतरल्या, Flipkart वर जबरदस्त ऑफर

लोकांच्या प्रतिसादाकडे लक्ष

व्हॉट्सअप कुठलंही नवं फिचर आणताना प्रथम काही दिवस बिटा युजर्सना ते वापरण्यासाठी देते. हे युजर्स फिचर प्रत्यक्ष वापरताना येणाऱ्या समस्या, अडथळे, सूचना वगैरे बाबी कंपनीला कळवतात. त्यानंतर या सूचनांनुसार फिचरमध्ये बदल केले जातात आणि नंतर ते फिचर बाजारात आणलं जातं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी