22 लाखांहून अधिक WhatsApp Accounts करण्यात आले बंद, तुम्हीही हे काम केलं तर पुढचा नंबर तुमचा

WhatsApp news updates: व्हॉट्सअ‍ॅपचा वापर जवळपास सर्वच स्मार्टफोन युजर्स करताना दिसत आहेत. यापैकीच जवळपास 22 लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट्स बॅन करण्यात आले आहेत.

WhatsApp
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशभरातील 22 लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट्स बॅन
  • गेल्या काही महिन्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे 

WhatsApp account ban: स्मार्टफोन युजर्सपैकी बहुतांश युजर्स हे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांचे लक्ष हे व्हॉट्सअ‍ॅपवरच असते. मात्र, याच व्हॉट्सअ‍ॅप युजर्सपैकी तब्बल 22 लाख अकाऊंट्स बॅन करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर कंपनीने मे महिन्यात 19 लाख अकाऊंट्स बॅन केले आहेत. एप्रिल महिन्यात 16 लाख आणि मार्च महिन्यात 18.05 लाख अकाऊंट्स बॅन करण्यात आले आहेत. (WhatsApp 22 lakh accounts banned may be next number yours if you do this technology news updates)

का केले अकाऊंट्स बॅन? 

आयटी नियम 2021 अंतर्गत कंपनीला आपल्या प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट द्यायचा आहे. या रिपोर्टमध्ये हे सांगायचे आहे की, कंपनीकडे किती तक्रारी आल्या आणि त्यापैकी किती जणांवर कारवाई करण्यात आली. कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं, "WhatsApp पर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिसेसचा दुरुपयोग रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवर युजर्स सुरक्षित रहावेत यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि इतर अत्याधुनिक टेक्निक, डाटा सायंटिस्टमध्ये कंपनीने सलग गुंतवणूक केली आहे." आपल्या महिन्याच्या रिपोर्टमध्ये कंपनीने म्हटलं, WhatsApp कडे 426 अपील्स आले होते आणि त्यापैकी 64 अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली.

अधिक वाचा : New Whatsapp Feature : आता व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनना मिळणार जास्तीचे अधिकार, लवकरच येतंय नवं फीचर

या कारणांमुळे बॅन होऊ शकतं अकाऊंट

WhatsApp ने म्हटलं, युजर्सला अशा लोकांना मेसेज करु नयेत जे त्यांना मेसेज न करण्याबाबत वारंवार सांगत असतात. जर एखादा व्यक्ती सांगितल्यानंतरही मेसेज करत असेल तर कंपनी अशा युजर्सला बॅन करते.

जर तुम्ही WhatsApp चा वापर बल्क मेसेज, ऑटोमेटेड मेसेज किंवा ऑटो डायलसाठी करता तर तुम्हाला बॅन केलं जाऊ शकतं. WhatsApp मशीन लर्निंग टेक्नोलॉजी आणि युजर्सची रिपोर्ट दोन्हीचा वापर अशा अकाऊंट्सची माहिती मिळवण्यासाठी आणि बॅन करण्यासाठी करतं जे नको असलेले ऑटोमेटेड मेसेज पाठवत असतात. 

विनापरवानगी कुणाचा नंबर शेअर करणं आणि डेटाचा वापर करणं हे तुम्हाला अडचणीचं ठरू शकतं. तसेच कुणाच्याही परवानगी शिवाय त्यांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करु नये. 

जर तुम्ही कुणाला अश्लील व्हिडिओ किंवा मेसेज पाठवता तर तुमचं अकाऊंट तर बॅन केलं जाईलच त्यासोबतच तुमच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी