Whatsapp New Feature: आजकाल स्मार्टफोन वापरणारा (Smartphone user) जवळपास प्रत्येक जण व्हाट्सअप (Whatsapp) वापरतो. व्हाट्सअपकडून वारंवार नवनवीन फीचर्स आणली जातात आणि ती अपडेट केली जातात. ग्राहकांना अधिक अधिक उत्तम आणि दर्जेदार सेवा देण्याकडे कंपनीचा कल असतो. त्यामुळेच नवनव्या कल्पना या ॲपवर राबवले जातात आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयोग करून त्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये व्हाट्सअप ने आपली ओळख कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. आता असेच आणखी एक नवे फीचर व्हाट्सअप घेऊन येत आहे. हे फीचर आहे व्हाट्सअप स्टेटसबाबतचे. या नव्या फीचरमुळे ग्राहकांना आपले स्टेटस अपडेट करण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
सध्या व्हाट्सअपवर दोन प्रकारे स्टेटस लावता येते. व्हिडिओ आणि टेक्स्ट असे दोन पर्याय स्टेटस अपडेटसाठी सध्या उपलब्ध आहेत. तुमच्या स्टेटसला तुम्ही कुठलाही व्हिडिओ लावू शकता किंवा मेसेज टाईप करू शकता. यासोबतच आता तुम्ही ऑडिओ फीचरही वापरू शकणार आहात. म्हणजेच तुम्ही तुमचा केवळ आवाज रेकॉर्ड करून तो स्टेटस म्हणून ठेवू शकाल. व्हाट्सअपमधील हा एक मोठा आणि क्रांतिकारी बदल असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
अधिक वाचा - WhatsApp वापरकर्त्यांनो ऐकलं का तुमचा डेटा आहे धोक्यात; जाणून घ्या सर्व प्रकरण
व्हाट्सअप स्टेटससाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ऑडिओची वेळ ही 30 सेकंद असणार आहे. तुम्ही तुमच्या ओरिजिनल आवाजात स्टेटस अपडेट करू शकता आणि ते अपलोड करू शकता. इतरांना तुमच्या आवाजातील हे स्टेटस थेट ऐकू येऊ शकेल. सध्या टेस्टिंग मोडवर हे फिचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचाच अर्थ काही ठराविक युजर्स ते वापरत असून त्यांच्या अनुभवावर आधारित चुका दुरुस्त करून मग ते फीचर सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल.
अधिक वाचा - Tata Tiago NRG iCNG : टाटा मोटर्सनी लॉंच केली भारतातील पहिली टफरोडर आयसीएनजी कार, पाहा जबरदस्त वैशिष्ट्ये
एखादे फीचर सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यापूर्वी ते टेस्टिंग मोडवर टाकले जाते. जगभरातील विविध देशांमधील काही नंबर हे टेस्टिंग मोडसाठी निवडण्यात आलेले असतात. या गटातील युजर्स अगोदर हे फिचर वापरतात आणि त्याविषयी आपला फीडबॅक देतात. त्या फीडबॅकच्या आधारे त्या ठराविक फीचर मध्ये अधिक सुधारणा केल्या जातात आणि पुन्हा एकदा ते फीचर टेस्टिंग मोडवर टाकले जाते. मग दुसऱ्यांदा हेच विचार वापरल्यानंतर पुन्हा सूचना आणि हरकती मागवण्यात येतात. या सूचनांच्या आधारे पुन्हा काही बदल या फिचरमध्ये केले जातात. अशाप्रकारे दोन वेळा बदल करण्यात आलेले हे फीचर सर्वसामान्य वापरकर्त्यांना दिले जाते. त्यामुळे अधिकाधिक अचूक फीचर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. सध्या टेस्टिंग मोडवर असलेले हे फीचर वापरकर्त्यांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.